sangli news : सांगली महापालिकेत 7 लाखाची लाच घेताना उपायुक्त जाळ्यात : राज्यात गेल्या काही महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाडीची मोहीम हाती घेतली असून लाचखोर अधिकारी, कर्मचार्यांना दणका दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकार्यास 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती.
sangli news : सांगली महापालिकेत 7 लाखाची लाच घेताना उपायुक्त जाळ्यात
आता, लाच मागितल्या प्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्तच लाच-लुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रातल्या एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांनी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 10 लाखांची मागणी करून 7 लाख रुपयांच्या रक्कमेवर तडजोड झाली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीला माहिती दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराच्या सांगण्यावरुन सापळ रचला.
त्यानुसार, तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उपायुक्त महोदयांनी 7 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यावरुन, एसीबीने उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
sangli-news-deputy-commissioner-caught-taking-bribe-of-rs-7-lakh-in-sangli-municipal-corporation
दरम्यान, महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, एसीबी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.