sangli news : धुळगाव शेरीनाला योजना फेल उन्हाळ्यात पंप सुरू अन् पावसाळ्यात बंद : शहरातील शेरीनाल्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी बंद व्हावा व कृष्णा नदी प्रदूषित होऊ नये म्हणून 23 वर्षांपूर्वी मंजूर झालेली धुळगाव शेरीनाला योजना फेल गेली आहे. शेरीनाल्याचे सांडपाणी उचलून धुळगावला सोडला जाते. त्या ठिकाणी शुध्दीकरण होऊन शेतीला दिले जाते. पण ही 33 कोटींची योजना ‘सिझनेबल’ झाली आहे.
sangli news : धुळगाव शेरीनाला योजना फेल उन्हाळ्यात पंप सुरू अन् पावसाळ्यात बंद
उन्हाळ्यात शेरीनाल्या पाण्याचे पंप सुरू असतात तर पावसाळ्यात पूर्णपणे बंद असतात. त्यामुळे धुळगाव योजना असून अडचण आणि नसून खोळांबा अशी स्थिती आहे. दरम्यान, जीवन प्राधिकरणने चुकीच्या पध्दतीने ही योजना राबविल्याने योजनेचा उपयोग मनपाला झाला नाही.
शेरीनाला आणि सांगलीचे राजकारण याचे गेल्या चार दशकांचे नाते आहे.
कधीकाळी राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेला हा प्रश्न आता राजकारणी आणि लोकांच्यही विस्मरणात गेला आहे. शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषित होते. वर्षाला सव्वा कोटींचा दंड मनपाला प्रदूषण मंडळाकडून केला जातो. तरी देखील मनपाचे डोळे उघडत नाहीत. मनपा क्षेत्रातील शेरीनाल्याचे पाणी जलशुध्दीकरण करण्यासाठी धुळगाव शेरीनाला योजना राबविण्यात आली. या योजनेला 6 मार्च 2001 ला प्रशासकीय मान्यता मिळाली. मुळची 22 कोटींची असणारी योजना 36 कोटींवर गेली, पण प्रश्न निकाली निघाला नाही. शेरीनाल्याचा सांडपाणी येथील नवीन बायपास पुलाजवळून उचलून ते धुळगावला नेण्याची ही योजना आहे. त्यासाठी कवलापुरला पंपिंग स्टेशन करण्यात आले आहे. ही योजना जीवन प्राधिकरण विभागाच्यामार्फत राबविली गेली होती.
धुळगाव येथील 1800 एकर शेतीला पाणी देण्याचा प्रस्ताव होता.
या योजनेतील अनेक अडथळे पार करीत 2009 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीआधी माजी मंत्री स्व. मदन पाटील यांनी योजना झालीच म्हणून बटन दाबले. तेव्हापासून आजपर्यंत जमेल तेव्हा पाणी उचलून धुळगावच्या ओढ्या, नाल्यांमध्ये सोडले जाते. धुळगाव येथील 1800 एकर शेतीला पाणी देण्याचा प्रस्ताव होता. पूर्वी दहा पंप पाणी उचलण्यासाठी प्रस्तावित केले होते. मात्र त्यानंतर पाच पंप मंजूर केले. त्यानंतर तीनच पंच प्रत्यक्षात जागेवर बसविले गेले, त्यातील दोनच पंप फक्त सुरू असतात. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न निकालात लागला नाही. तर दुसरीकडे धुळगाव येथील शेतकर्यांना या योजनेचे पाणी देण्याचा निर्णय झाला होता. पण धुळगावकरांनी केवळ पाणी न सोडता आम्हाला वितरण व्यवस्था निर्माण करून द्यावी, अशी मागणी केली होती. अनेकवेळा चर्चा झाल्या.
sangli-news-dhulgaon-sherinala-scheme-fails-pumps-open-in-summer-and-shut-down-in-monsoons
तत्कालिन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी देखील दोनवेळा मंत्रालयात बैठका घेतल्या. वाढीव 6 कोटी मंजूर कराव्यात, अशी मागणी झाली. पण कालांतराने हा निधी मिळाला नाही. त्यामुळे धुळगावमधील शेतकर्यांना ज्यावेळी पाणी हवे असते, म्हणजे उन्हाळ्यात योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली जाते. पाच ठिकाणी असलेल्या तळ्यात हे पाणी शुध्दीकरण होऊन हे शेतीला दिले जाते. पण पावसाळ्यात या पाण्याची गरज नसते. त्यामुळे शेतकरी पाण्याची मागणी करत नाहीत. परिणामी महापालिकेला या योजनेवरील पंप बंद ठेवावे लागतात. प्रत्यक्षात या योजनेचे पाणी सांगलीतच शुध्दीकरण होणे आवश्यक होते. तसा प्रकल्प उभा राहणे आवश्यक होते. पण तसे झालेले नाही. त्याचा परिणाम नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे ही योजना पूर्णपणे फेल गेली आहे.
नव्या 94 कोटींचा सांडपाणी प्रकल्पाकडे लक्ष
महापालिकेने आता सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी 94 कोटींचा नव्याने प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. कुपवाड ड्रेनेज योजना सुरू असल्याने सांडपाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे सांगलीसाठी नव्याने 22 एमएलडी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शिवाय सांगलीवाडी येथे तीन एमएलडीचा एसटीपी प्रकल्प देखील उभारण्यात येणार आहे. शिवाय जे. जे. मारुती येथे पंप बांधून ते पाणी शेरीनाल्यापर्यंत आणण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सांगलीकरांना आता या प्रकल्पाची प्रतिक्षा आहे.
धुळगाव शेरीनाला योजना आढावा…
मूळ योजनेची किंमत- 22 कोटी 12 लाख
योजनेला अंतिम मान्यता 6 मार्च 2003
एकूण सुधारित किंमत- 34 कोटी 95 लाख
आजअखेरचा एकूण खर्च – 33 कोटी 66 लाख
आणखी अपेक्षित खर्च- सुमारे 6 कोटी

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



