sangli news : जिल्ह्यातील माजी आमदारांची अस्तित्वासाठी धडपड : जिल्ह्यात विविध पक्षात अनेक वर्षे काम करूनही सध्याच्या पक्षात शब्दाला किंमत न राहिल्याने आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी जिल्ह्यातील तीन माजी आमदारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. अजितदादांना विनवण्या करून अखेर प्रवेशासाठी होकार मिळवल्याची चर्चा असून कार्यकर्त्यांशी कोणतीही जाहीर चर्चा न करता घाईघाईत पुढील आठड्यात पक्ष प्रवेश उकरण्याची चर्चा रंगली आहे. या प्रवेशाने अजितदादांच्या राष्ट्रवादीला ताकद मिळणार की केवळ नेत्यांची सोय होणार हे लवकरच समजणार आहे.
sangli news : जिल्ह्यातील माजी आमदारांची अस्तित्वासाठी धडपड
कार्यकर्त्यांशी चर्चा न करताच अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार
राज्यात, जिल्ह्यात काँग्रेस सारखा एकच बलाद्य पक्ष असल्यापासुन राजकारणात असणारे जिल्ह्यातील काही (दिग्गज) नेते सध्या सत्ताधार्यांच्या वळचणीला जाण्यासाठी धडपडत आहेत. या तीन माजी आमदारांपैकी एक माजी मंत्री आहेत. काही वर्षापूर्वी यापैकी काहीजण काँग्रेसमध्येच होते. त्यानंतर कधी अपक्ष तर कधी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या पक्षाकडून या नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तत्कालिन काँग्रेस, शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीसारख्या पक्षांशी संधान साधत विकास कामांच्या नावावर मंत्रीपदेही मिळवली. त्यानंतर काहींनी काँग्रेसमध्ये, काहींनी कधी राष्ट्रवादीत तर कधी भाजपमध्ये तर वेळेनुसार कोणी शिवसेेनेतही प्रवेश केला. त्याचबरोबर आपापल्या संस्थांची, जवळचे कार्यकर्ते यांची कामे करून घेण्यातही बाजी मारली.
वरिष्ट नेत्यांंनी या लोकांना ताकद दिली. विविध माध्यमातुन मदतीचा हात दिला.
मात्र कधी जिल्ह्यातील कधी राज्यातील संबधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी न पटल्याने ही मंडळी कार्यरत असणार्या पक्षाशीही फटकून वागू लागली. काहींनी उघडपणे भूमिका घेत कार्यरत असणार्या पक्षाला, पक्षाच्या निवडणूकीतील काही निर्णयांना विरोध केला तर काहींनी सोयीनुसार कधी उघडपणे तर कधी चोरीचुपके वेगळ्या भूमिका घेतल्या. काहींनी काहीच न करता शांत राहून संबधितांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
काहींनी तर अनेक मदत, सहकार्य करूनही जिल्हा परिषद-पंचायत समितीसारख्या महत्वाच्या निवडणुकीत रात्रीत निर्णय बदलला. कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी रात्री ए.बी.फॉर्म एका पक्षाचे घेतले तर सकाळी वेेगळ्याच पक्षाचा झेंडा हाती घेतला. काहींनीतर संस्था अडचणीत असल्याने संस्थांना व त्यामाध्यमातुन स्वतःला मदत मिळावी म्हणून पक्ष बदलले, मदत मिळवली. संस्था काही प्रमाणात रूळावर येऊ लागल्या.
दुसरीकडे स्वतः स्पष्ट वक्ते असल्याचे सांगत सतत विरोधकांना अंगावर घेणारे, राज्यातील, देशातील सध्याच्या मोठ्या पक्षात असतानाही पक्ष निर्णयाविरोधात भूमिका घेणारे काही जण सध्या मात्र पक्ष प्रवेशासाठी चोरीचुपके, गुप्त बैठका घेताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार, जयंत पाटील), भाजप, शिवसेना अशा फेर्या पूर्ण झाल्यानंतर जुन्या ओळखीचा फायदा घेत काही जणांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी जाळे पसरले आहे. अनेक फेर्या विनवण्या केल्यानंतर अजितदादांनी स्वतः थेट चर्चा न करता ती जबाबदारी प्रदेशाध्यक्षांवर सोपवली. त्यांच्याकडे पाठपुरावा करून अखेर पक्षात प्रवेश देण्यास होकार मिळवण्यात नेते यशस्वी झाले आहेत.
sangli-news-former-mlas-in-the-district-struggle-for-survival
काही दिवसांपूर्वी या नेत्यांनी गुप्त बैठक घेतल्याची उघड चर्चा सुरू झाली. मात्र या नेत्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अद्याप आपल्या कार्यकर्त्यांची उघड चर्चा, अथवा मेळावा घेऊन मते अजमावण्याचा कार्यक्रम अद्याप केलेला नाही. मात्र तरीही पुढील आठवड्यात पक्ष प्रवेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
नव्या नेतृत्वाचा अभाव
जिल्ह्यातील काही मंडळी सध्या अजितदादांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यापैकी बहुतांश अनेक दिवस राजकारण करून बसलेली मंडळी आहे. त्यांचे जुने कार्यकर्तेही आता राजकारणापासुन अलिप्त आहेत. त्याठिकाणी नवे, तरूण नेतृत्व पुढे आले आहे. त्यामुळे ही मंडळी सध्याच्या घरात दुर्लक्षित आहेत. त्यामुळे यांच्या प्रवेशाने नव्या दमाचे, आक्रमक नेतृत्व मिळेल का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.