पहिल्या दिवशी 4 हजार पोत्यांची आवक, सरासरी साडेतेरा ते 21 हजाराचा दर
sangli news : मुहुर्ताच्या हळदीला उच्चांकी 21 हजाराचा भाव : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डात मंगळवारी नवीन राजापुरी हळद सौद्याचा शुभारंभ झाला. बावची (ता. वाळवा) येथील शेतकरी नितीन भास्कर कोकाटे यांच्या हळदीला क्विंटलला 21 हजार 300 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. यार्डात 13 हजार 500 ते 21 हजार 300 असा दर आहे. पहिल्याच दिवशी 4 हजार पोत्यांची आवक झाली. सांगली बाजार समितीमध्ये शेतकर्यांनी जास्तीत-जास्त हळद विक्रीसाठी आणावी, असे आवाहन सभापती सुजय शिंदे यांनी केले.
sangli news : मुहुर्ताच्या हळदीला उच्चांकी 21 हजाराचा भाव
येथील मार्केट यार्डात नवीन हळद सौद्यांचा शुभांरभ जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याहस्ते बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, उपसभापती रावसाहेब पाटील यांच्यासह सर्व संचालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जय श्रीराम ट्रेडिंग कंपनी या दुकानात बावची येथील नितीन भास्कर कोकाटे या शेतकर्याची हळद रुपये 21 हजार 300 रुपये प्रति क्विंटल या उच्चांकी दरात मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केली. मुहुर्ताच्या पहिल्या दिवशी 4 हजार पोत्यांची आवक झाली. हळदीला कमीत कमी 13 हजार 500 ते जास्तीत जास्त 21 हजार 300 असा दर मिळत आहे.
सांगलीची हळद पेठ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेश, बेळगाव, विजापूरसह शेजारच्या सीमाभागातील हळद सांगली बाजार समितीकडे विक्रीसाठी येते. डिसेंबर महिन्यांपासून हळद काढणीला सुरुवात झाल्यानंतर जानेवारी अथवा फेबु्रवारीमध्ये बाजार समितीमध्ये नवीन हळद सौद्यांना सुरुवात केली जाते.
यावेळी बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील, स्वप्निल शिंदे, बिराप्पा शिंदे, शशिकांत नागे, बसवराज बिराजदार, प्रशांत पाटील, काडापा वारद, मारुती बंडगर, माजी सभापती सिकंदर जमादार, सचिव महेश चव्हाण, उपसचिव नितीन कोळसे, चेंबरचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, हळद खरेदीदार, अडते, शेतकरी, हमाल, तोलाईदार उपस्थित होते .
तारण कर्ज योजनेत सहभागी व्हा ः सुजय शिंदे
सांगलीतील मार्केट यार्डात हळद उत्पादक शेतकर्यांनी आपली जास्तीत जास्त हळद विक्रीसाठी आणावी. शेतकन्यांसाठी चालू असणारी शासनाची हळद व बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



