rajkiyalive

SANGLI NEWS : सांगलीच्या आयुक्त निवासस्थानात लाखांचे बेसीन, दीड लाखांचे स्मार्ट कुलूप, हायटेक प्रवेशव्दार

जनप्रवास । सांगली

SANGLI NEWS : सांगलीच्या आयुक्त निवासस्थानात लाखांचे बेसीन, दीड लाखांचे स्मार्ट कुलूप, हायटेक प्रवेशव्दार : शहरातील पूरपट्ट्यातील बांधकामांवर कारवाई करणार्‍या महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार आहे. पूरपट्ट्यात येत असलेल्या आयुक्त निवासस्थानावर लाखो रूपये उधळण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. आयुक्त निवासस्थान सुस्थितीत असताना नूतनीकरणासाठी तब्बल सव्वा कोटींचा विनानिविदा खर्च केला जात आहे. यामध्ये हायटेक प्रवेशव्दार, फर्निचर, दीड लाखांचे दोन स्मार्ट कुलूपे, प्रत्येकी बारा हजाराचे सेन्सॉर बेसीन यासह अनेक अद्यावत साहित्य बसवले गेले आहे. याची चर्चा आता महापालिकेत सुरू झाली आहे.

SANGLI NEWS : सांगलीच्या आयुक्त निवासस्थानात लाखांचे बेसीन, दीड लाखांचे स्मार्ट कुलूप, हायटेक प्रवेशव्दार

महापालिकेच्या आयुक्तांना पूर्वी प्रशासनाचे निवासस्थान नव्हते. पूरपट्ट्यातील सर्किट हाऊसच्या पाठीमागे आयुक्त निवासस्थान बांधण्यात आले. पण सांगली शहराला महापुराचा विळखा बसत असल्याने काही आयुक्तांना या निवासस्थानात राहणे पसंत नव्हते. त्यामुळे ते गुलमोहर कॉलनीतील एका भाड्याने बंगल्यात राहत होते. पण तत्कालिन आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी आयुक्त निवासस्थानात राहणे पसंत केले. किरकोळ दुरूस्ती करून त्यांनी राहण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर येणार्‍या प्रत्येक आयुक्तांनी लाखो रूपयांचे नूतनीकरण करून निवासस्थानात राहणे पसंत केले होते.

सन 2005 च्या महापुरापासून आयुक्तांचा बंगला चर्चेत आहे.

2005 पासून आलेल्या तीन महापुरात आयुक्तांचा पाण्याखाली गेला. 2019 ला देखील मोठा महापूर आला होता. तत्कालिन आयुक्त नितीन कापडणीस यांनी आयुक्त निवासस्थानाचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण केले होते. निवासस्थानाशेजारी बगीचा देखील विकसीत केला होता. मात्र महापुरामुळे या ठिकाणी मोठे नुकसान झाले. अनेक सामाजिक संघटनांनी या विरोधात आवाज उठवला होता. आयुक्तांनी जनतेच्या पैशातून बंगल्याची डागडुजी आणि नूतनीकरण केले, यासाठी लाखो रूपयांचा चुराडा झाला होता.

वारंवार खर्च करण्यापेक्षा आयुक्तांनी पूर पट्ट्याबाहेर सुरक्षित निवासस्थान निवडावे, अशी मागणी नागरिकांतून होत होती.

तरी देखील आयुक्त निवास्थानावर पुन्हा लाखो रूपयांचा खर्च केला गेला. कापडणीस यांची बदली झाल्यानंतर सुनील पवार यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतला. मात्र दोन महिने त्यांना निवासस्थान मिळाले नाही. त्यानंतर आयुक्त बंगल्यावर पुन्हा लाखो रूपयांची उधळपट्टी करत नूतनीकरण करण्यात आले. सुनील पवार यांची बदली झाल्यानंतर नूतन आयुक्तपदाची सूत्रे शुभम गुप्ता यांनी स्वीकारली आहेत.

त्यांनी पुन्हा या बंगल्याचे नूतनीकरण केले आहे. त्यामध्ये अत्याधुनिक स्टाईलचे नूतनीकरण केले जात आहे.

यासाठी सव्वा कोटींवर खर्च केला जात आहे. आकर्षक फर्निचर तयार केले जात आहेत. तसचे दोन स्मार्ट कुलूप बसविले जात आहेत. त्यात एकाची किंमत सुमारे दीड लाखाच्या आसपास आहे. हे कुलूपाला फिंगर लॉक आहे. तर सेसॉन्स बेसीन बसविली आहेत. सहा बेसीनची किंमत लाखांच्या घरात आहे. यासह अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा केल्या जात आहेत.

बंगल्याच्या बाहेर असलेल्या मेन प्रवेशव्दाराचे नूतनीकरण देखील करण्यात आले आहे.

वास्तविक पूरपट्ट्यातील बंगल्यासाठी प्रत्येक आयुक्त दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च का करतात? असा सवाल नागरिक आहेत. पूरपट्ट्यात बांधकामांना परवानगी नाही. गोरगरिबांवर कारवाई हातोडा उचलला जातो. मग पुराचे पाणी घुसणार्‍या आयुक्त निवासस्थानावर लाखोंचा चुराडा का केला जातो? असा सवाल नागरिकांतून होत आहे.

महापूर आल्यानंतर लाखोंचा खर्च पाण्यातच…

यावर्षी जादा पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे. शिवाय गेल्यावर्षी पेक्षा या जूनमध्ये चांगला पाऊस पडला आहे. जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे महापूर येण्याची शक्यता देखील आहे. तशी तयारी प्रशासन करत आहे. पण प्रत्येक पुराच्या विळख्यात असलेल्या आयुक्त निवासस्थानावर जून-जुलैमध्येच लाखो रूपये खर्च केले जात आहेत. महापूर आल्यास झालेला एक कोटींचा खर्च देखील पुराच्या पाण्यातून वाहून जाण्याची शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज