rajkiyalive

sangli political news : एकदाच आमदारकी, वारसदारांनाही संधी नाही

दिनेशकुमार ऐतवडे

sangli political news : एकदाच आमदारकी, वारसदारांनाही संधी नाही : विधानसभेचे रणकंदन सुरू आहे. अनेकांनी आमदारकी मिळावी म्हणून भलताच जोर लावला आहे. अनेकांना पक्षाकडून तिकीट मिळाले आहे तर काहींनी आमदारकीसाठी बंडखोरीही केली आहे. जिल्ह्यात असे अनेक नेते होवून गेले की त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदाच आमदारकी मिळाली पुन्हा त्यांच्या वारसांना अजूनही आमदारकी मिळाली नाही. आमदारकीसाठी कित्येक आमदार पूत्र अजूनही झगडत आहेत.

sangli political news : एकदाच आमदारकी, वारसदारांनाही संधी नाही

जिल्ह्यातील शिराळा येथून, सरोजनी बाबर, मिरजेतून कळंत्रे आक्का, एन. आर. पाठक, खानापूरातून दत्ताजीराव देशमुख, वाळव्यातून नागनाथअण्णा नायकवडी, सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे, प्रा. पी. बी. पाटील, दिनकरतात्या पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, जतमधील मधुकर कांबळे आणि विलासराव जगताप यांना आपल्या आयुष्यात आजपर्यंत एकदाच आमदारकी मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्या वारसांना आमदारकी मिळाली नाही.

1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिराळा मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे ज्येष्ठ लेखिका सरोजनी बाबर निवडून आल्या. त्यानंतर त्यांना कुठेच संधी मिळाली नाही. त्याच निवडणुकीत मिरजेतून जैन समाजाच्या कळंत्रेआक्का तसेच खानापूरमधून दत्ताजीराव देशमुख हे निवडून आले होते. दत्ताजीराव देशमुख हे राजारामबापूंचे साडू तसेच ज्येष्ठ वक्ते इंद्रजित देशमुख यांचे वडील होत. पुन्हा त्यांना आमदरकीही मिळाली नाही आणि त्यांच्या वारसांनाही तशी संधी मिळाली नाही.

1967 मध्ये आप्पासाहेब बिरनाळेंना सांगलीतून दादांनी विधानसभेवर निवडून आणले तसेच दादांनी शांतीनिकेतनचे प्रा. पी. बी. पाटील यांनाही एका निवडून आणले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. त्यांचे वारसदारही आमदारकीपासून वंचित राहिले. आप्पासाहेब बिरनाळे यांचे चिरंजिव बबनराव बिरनाळे यांचे नाव 1999 च्या विधानसभा निवडणुकीत अग्रभागी होते परंतु त्यांना तिकीट मिळालेे नाही.
1995 च्या निवडणुकीत जतमधून विलासराव जगताप यांनी मधुकर कांबळे यांना निवडून आणले होते. त्यानंतर मधूकर कांबळे राजकारणात कुठेच दिसले नाहीत. याच निवडणुकीत आटपाडी खानापूरातून अपक्ष उमेदवार राजेंद्रअण्णा देशमुख यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांना कुठेच संधी मिळाली नाही. 1999 च्या निवडणुकीत जतमधून विलासराव जगताप, सांगलीतून दिनकरतात्या पाटील निवडून आले त्यांनाही एकदाच संधी मिळाली. पुन्हा संधी मिळाली नाही.

सध्याच्या राजकारणात नवीन पिढी आली असली तरी यापूर्वी अनेकांनी विधानसभेचे मैदान गाजवले आहे. परंतु त्यांना एकदाच संधी मिळाली. त्यानंतर त्यांचे वारसदारही आमदारकी मिळवू शकले नाहीत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज