sangli political news : खासदार विशाल पाटील, विश्वजीत कदम यांनी घेतली आजी-माजी पदाधिकार्यांची बैठक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुमकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार जयारी केली जात असताना शांततेत असलेले जिल्ह्यातील काँग्रेस नेतेही अखेर सरसावले. पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला झटका बसल्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी आजी-माजी नगरसेवकांसह ग्रामीण पदाधिकार्यांची बैठक घेवून चर्चा केली. निवडणुकीबाबत व्युहरचना आखताना काँग्रेसमधून गळती थांबवण्याचा नेत्यांचा प्रयत्न असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले.
sangli political news : खासदार विशाल पाटील, विश्वजीत कदम यांनी घेतली आजी-माजी पदाधिकार्यांची बैठक
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काँग्रेस नेते सरसावले
येथील भारती हॉस्पिटलच्या विश्रामगृहात आमदार विश्वजी कदम आणि खासदार पाटील यांनी सांगली, मिरजमधील माजी नगरसेवकांसह ग्रामीण भागातील पदाधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर किशोर जामदार, संजय मेंढे, मंगेश चव्हाण, विशाल कलगुटगी, काँग्रेसचे मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी प्रशासनानपे सुरु केली आहे.
त्यानंतर सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची निवडणूकही होणार आहे. मागील काही दिवसांपासून महायुतीकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. मात्र महाविकास आघाडीचे शांत होते. या कारणांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात अस्वच्छता पसरली असताना आमदार डॉ. कदम आणि खासदार पाटील हे दोघे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले.
पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना धक्का दिला होता.
आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाने आम्हांला काय दिले, हे सर्वांना माहिती आहे. दरवेळी आपली वेळ आली की आमच्यावर अन्याय झाला असे म्हणायचे, असे होत आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून न्याय मिळत नसल्याने जयश्रीताईंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला झटका बसला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात गळती होणार नाही, याबाबतची दक्षता घेवून आमदार कदम आणि खासदार पाटील सावध झाले आहेत.
महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत माजी महापौरांसह नगरसेवकांशी सविस्तर चर्चा केली.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे. याबाबत माजी नगरसेवकांना बोलावून एक-एकाशी बंद खोलीत संवाद साधण्यात आला. महापालिका क्षेत्रातील प्रभागातील स्थिती, निवडणुकीसाठी इच्छुकांबाबतची माहिती घेण्यात आली. तसेच कदम यांनीही माजी नगरसेवकांना काही सूचना केल्या.
MPs Vishal Patil, Vishwajit Kadam held a meeting of current and former office bearers
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रित लढविणार आहे. याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तुम्ही तयारीला लागा, आपण ताकदीने लढू, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते. कार्यकर्त्यांना वार्यावर सोडले जाणार नसल्याचे खासदार पाटील आणि आमदार डॉ. कदम यांनी कार्यकर्त्यांचे बळ वाढवण्याचा प्रयत्न केला.
जयंत पाटील यांच्याशी लवकरच चर्चा
महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवल्या जाणार आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. त्यांच्याशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाईल, असेही काँग्रेस नेते आ. डॉ. विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांनी पदाधिकार्यांना सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.