दिनेशकुमार ऐतवडे 9850652056
sangli politicks : जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी निवडणूक : 1980 हणमंतराव पाटलांचा केवळ 1033 मतांनी विजयी : विधानसभा निवडणुकीची रंगत आली आहे. अर्जाची छानणी झाली असून, अनेक ठिकाणी बंडखोरांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात खरी लढत आहे ती भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत आहे. जिल्ह्यात अनेक लक्षवेधी लढती झाल्या आहेत. परंतु सर्वात लक्षवेधी लढत झाली ती 1980 मध्ये या निवडणुकीत. या निवडणुकीत खानापूर आटपाडी मतदार संघातून समाजवादी पक्षाचे हणमंतराव पाटील यांनी केवळ 1033 मतांनी विजय मिळविला होता.
sangli politicks : जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी निवडणूक : 1980 हणमंतराव पाटलांचा केवळ 1033 मतांनी विजयी
इंदिरा गांधींनी 17 फेब्रुवारी 1980 रोजी महाराष्ट्र सरकार बरखास्त केले आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मे महिन्यात निवडणुका जाहीर केल्या. 28 मे 1980 रोजी पुन्हा एकदा राज्यात निवडणुका झाल्या.
सांगली जिल्ह्यात यावेळी 9 जागांची निर्मिती करण्यात आली होती. 9 पैकी 6 जागा दादांनी आय काँग्रेसमधून निवडून आणले. सांगली जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात लक्ष्यवेधी आणि चुरशीची निवडणूक झाली खानापूर आटपाडीचे येथे विट्याचे नेते हणमंतराव पाटील शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसमधून उभे होते. त्यांच्या विरोधात आय काँग्रेसतर्फे शहाजीराव गणपतराव साळुंखे हे उभे होते. भाजपतर्फे बंडोपंत नारायण देशमुख तर गौरीहर भाउसाहेब लकडे हे अपक्ष उभे होते. रावसाहेब शिंदे हे कामगार पक्षातर्फे उभे होते.
या निवडणुकीत हणमंतराव पाटील यांना 33 हजार 416 मते मिळाली तर शहाजीराव गणपतराव साळुंखे यांना 32383 मते मिळाली. भाजपच्या बंडोपंत नारायण देशमुख यांना केवळ 1231 मते मिळाली. लकडे यांना 1268 तर रावसाहेब शिंदे यांना 8335 मते मिळाली. समाजवादी काँग्रेसच्या हणमंतराव पाटील यांनी यांनीही ही निवडणूक केवळ 1033 मतांनी जिंकली.
विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे वडील आणि सध्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार वैभव पाटील यांचे आजोबा हणमंतराव पाटील हे मोठे प्रस्थ होते. 50 वर्षाहून अधिक काळ त्यांच्या ताब्यात विटा नगरपालिका होती. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील आणि त्यांच्यात वैचारिक मतभेद होते. दादा आय काँग्रेसमध्ये होते तर हणमंतराव पाटील यांनी शरद पवारांच्या समाजवादी पक्षास पाठिंबा दिला होता. शरद पवारांनाही जिल्ह्यात दादांच्या विरोधात कोणीतरी मोठा माणूस हवा होताच. शरद पवारांनी हणमंतराव पाटील यांना मोठी मदत केली आणि अटीतटीच्या लढतीत हणमंतराव पाटील यांचा केवळ 1033 मतांनी विजय झाला.
1980 नंतर पुन्हा एकदा योगायोग जुळून आला आहे. हणमंतराव पाटील हे शरद पवार यांच्या पक्षाकडून उभे होते तर यंदाही त्यांचे नातू वैभव पाटील हेही शरद पवार यांच्या पक्षाकडून उभे आहेत. आजोबांच्या सभेसाठी शरद पवार विट्यात आले होते. आता नातवाच्या सभेसाठी शरद पवार विट्यात येणार आहेत. यंदाची निवडणूकही अत्यंत चुरशीची होत आहे. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडून वैभव पाटील, महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यंदाच्या निवडणुकीत काय होणार हे 23 नोव्हेंबरलाच कळेल.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.