rajkiyalive

SANGLI : समडोळीत संगोष्ठी समारोह आणि मांगलिक विधानाचे आयोजन

SANGLI : समडोळीत संगोष्ठी समारोह आणि मांगलिक विधानाचे आयोजन : विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य 108 प.पू शांतीसागरजी महाराज यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या मिरज तालुक्यातील समडोळी येथे विद्वत संगोष्ठी आणि मांगलिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवार 27 रोजी दुपारी तीन वाजता कार्यक्रमाच्या विविध सवाल होणार असल्याची माहिती कमिटीने दिली.

 

 

SANGLI : समडोळीत संगोष्ठी समारोह आणि मांगलिक विधानाचे आयोजन

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056

आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पदारोहण शताब्दी वर्षानिमित्त समडोळी येथे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येथील श्री 1008 भ. महावीर जिनमंदिर, समडोळी यांच्यावतीने आणि शांतीसागर को. ऑप. के्रडीट सोसायटी, समडोळी यांच्या सहकार्याने दि. 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल असे सलग तीन दिवस विद्वत संगोष्ठी आणि मांगलिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी संयममूर्ती प. पू. 108 आचार्य श्री वर्धमानसागर महाराज, निर्यापक भ्रमण प. पू. 108 श्री धर्मसागरजी महाराज, निर्यापक भ्रमण प. पू. 108 श्री विद्यासागरजी महाराज, निर्यापक भ्रमण प.पू. 108 श्री सिध्दांतसागरजी महाराज आणि स्वस्तिश्र्री जिनसेनजी भटृटारक पटृटाचार्य महास्वामी, नांदणी यांचे आशिर्वाद लाभणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रतिष्ठाचार्य म्हणून डॉ. प. श्र्री सम्मेदजी उपाध्ये, साजणी हे काम पाहणार असून, त्यांच्या बरोबर रूपेशकुमार उपाध्ये आणि वृषभनाथ उपाध्ये हे स्थानिक पंडित असणार आहेत. संगीतसाथ सोनाली देसाई चौगुले यांची मिळणार आहे.

शनिवार दि. 30 रोजी पहाटे पाच वाजता सुप्रभात स्त्रोत, सकाळी 7 वाजता ध्वजारोहण, सकाळी 7.35 वाजता पंचामृत अभिषेक व महाशांतीधारा श्री शांतीसागर मुनी निवास शिलान्यास, सकाळी 9 वाजता मुनीसंघाची आहारचर्या, सकाळी 11 वाजता मंडप उद्घाटन, दीपप्रज्वलन, मंगल कुंभ स्थापना, वेदीवर जिनबिंब स्थापना, सकाळी 11 .30 वाजता भक्तांबर विधान, 48 बिजाक्षर, दुपारी 2 वाजता वि्दवत संगोष्ठी उद्घाटन कार्यक्रम आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिनधर्मप्रभावक, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर भालचंद्र पाटील, रावसाहेब जिनगोंडा पाटील, अजित पाटील यांची प्रमुुख उपस्थिती असणार आहे. दुपारी 2.30 वाजता विद्वत संगोष्ठीच्या पहिल्या सत्रात ब्र. डॉ. धर्मेद्रभाई जैन, डॉ. शितलचंद्रजी जैन जयपूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी 4.30 वाजता आचार्य श्रींचे मंगल प्रवचन, सायंकाळी 7 वाजता महामंत्र, जाप्य व विद्वत संगोष्ठी सत्र दुसरे होणार आहे. यासाठी डॉ. सी. एन. चौगुले, सांगली यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. रात्री 9 वाजता सवाल कार्यक्रम, सौधर्म इंद्र व इतर. तर रात्री 9.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरती होणार आहे.
रविवार 31 रोजी पहाटे 5 वाजता सुप्रभात स्तोत्र, सकाळी 7.35 वाजता पंचामृत अभिषेक व महाशांतीधारा, सकाळी 9 वाजता मुनीसंघांची आहारचर्या, सकाळी 11. 30 वाजता श्र्री वर्धमान स्तोत्र विधान 64 बिजाक्षर, दुपारी 2.30 वाजता विद्वत संगोष्ठी सत्र 3 रे होणार आहे. यावेळी डॉ. सुरेंद्रभारती जैन, डॉ. नरेंद्रभारती जैन, छत्तीसगढ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी 4.30 वाजता आचार्य श्रींचे मंगल प्रवचन, सायंकाळी 7 वाजता महामंत्र जाप्य, सायंकाळी 7.30 वाजता विद्वत संगोष्ठी सत्र चौथे मध्ये डॉ. अजित पाटील मुख्यमहामंत्री यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री 8.30 वाजता सवाल कार्यक्रम, सौधर्म इंद्र, 5 घोडे व रथ. रात्री 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री 9.30 वाजता संगीत आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.

सोमवार 1 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता सुप्रभात स्तोत्र, सकाळी 7 वाजता पंचामृत अभिषेक व महाशांतीधारा, सकाळी 9 वाजता मुनीसंघांची आहारचर्या, सकाळी 11.30 वाजता श्री एकीभाव स्तोत्र विधान, 26 बिजाक्षर, दुपारी 2.30 वाजता मुनीसंघ पूजा, दुपारी 3 वाजता आचार्यश्रींचे मंगल प्रवचन, सायंकाळी 5 वाजता मंगल आरती, विसर्जन व ध्वजाअवरोहण, सायंकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत.

वरील सर्व कार्यक्रम आर्ष परंपरेनुसार होणार असल्याची माहिती संयोजकांच्यावतीने देण्यात आले आहे.

शनिवार 30 रोजीचे सौधम्र इंद्र, ध्वजारोहण, मंडप उद्घाटन, अखंड दीप प्रज्वलन हे सवाल बुधवार दि. 27 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहेत. बाहेर गावाहून येणार्‍या सर्वांची व्हासाची सोय करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे संयोजन श्र्री 1008 भ. महावीर दिगंबर जिनमंदिर, श्र्री 1008 भ. आदीनाथ दिगंबर जिनमंदिर, श्री 1008 भ. शांतीनाथ दिगंबर जिन मंदिर, शांतीसागर चॅरिटेबल ट्रस्ट, शालिनी पाटील मळा, वीरसेवा दल शाखा 1 व 2, वीर महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज