सांगली :
SANGLI : आता सिटीबसमध्येही महिलांना 50 टक्के सवलत स्वाभिमानीच्या लढ्याला यश ; संदीप राजोबा : स्वाभिमानीच्या लढ्याला अखेर यश महिलांना शहरी (सिटी) बसेस मध्ये ग्रामीण बसेस व लांब पल्ल्याच्या गाड्या प्रमाणे 50% सवलत व 65 ते 75 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के तिकीट दरामध्ये सवलत तसेच 75 वर्षे वयाच्या सर्व नागरिकांना मोफत प्रवास मिळावी या मागणीच्या लढ्याला यश यश मिळाले अशी माहिती संदीप राजोबा दिली
SANGLI : आता सिटीबसमध्येही महिलांना 50 टक्के सवलत स्वाभिमानीच्या लढ्याला यश ; संदीप राजोबा
SANGLI : आता सिटीबसमध्येही महिलांना 50 टक्के सवलत स्वाभिमानीच्या लढ्याला यश ; संदीप राजोबा : महाराष्ट्र सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामीण व लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवासामध्ये महिलांना 50 टक्के सवलत तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत व 75 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना मोफत प्रवास अशी योजना जाहीर केलेली होती. परंतु सांगली, मिरज, रत्नागिरी व नांदेड या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शहरी बस सेवा (सिटी बसेस) यांना ही सवलत लागू नव्हती ती लागू व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवला होता व त्यास यश मिळाले अशी माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संदीप राजोबा यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सांगली व मिरज एसटी डेपोच्या माध्यमातून सिटी बस सुरू आहेत.
या बसेस ग्रामीण भागातील 20 किलोमीटरपर्यंत जातात खर्या अर्थाने महानगरपालिकेचा व वीस किलोमीटर पर्यंतच्या ग्रामीण गावांचा काहीही संबंध नव्हता. परंतु केवळ शहरी शब्दाचा व सरकारी धोरणाचा फटका पलूस मिरज व शिरोळ तालुक्यातील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जवळच्या उपनगरांना व ब्रम्हनाळ, खटाव, सुखवाडी, वसगडे, भिलवडी, औदुंबर, माळवाडी, धनगाव, नांद्रे, कर्नाळ, दुधगाव, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, कवठे पिराण, समडोळी, बागणी, मालगाव, म्हैशाळ, लक्ष्मीवाडी, गुंडेवाडी, तसेच शिरोळ तालुक्यातील शिरोळ, कुरुंदवाड व नरसिंहवाडी तसेच 20 किलोमीटरच्या एरियामधील ग्रामीण भागातील महिलांना बसत होता.
त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये शहरी बसेसमध्ये सुद्धा 50 टक्के सवलत व 65 ते 75 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये 50% सवलत व 75 वर्षे च्या वरील सर्व नागरिकांना मोफत सिटी प्रवास असे ठराव विशेष ग्रामसभेमध्ये घेतले होते व ते ठराव मुख्यमंत्र्यांना व त्यांचे सचिव विकास खारगे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये दिले होते व मागणी न मान्य झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे सांगितले होते.
शासनाने आमची मागणी मान्य करून ग्रामीण व लांब पल्ल्याच्या एसटी बसेस प्रमाणे महिलांना व 65 ते 75 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये 50% सवलत व 75 वर्षे च्या वरील सर्व नागरिकांना मोफत सिटी बसचा प्रवास असा शासन निर्णय काल काढण्यात आलेला याविषयी ग्रामीण भागातील महिलांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभारलेल्या लढ्याचे व महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याचे मनोमन आभार मानत समाधान व्यक्त केले आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



