rajkiyalive

SANGLI VIDHANSABHA 2024 : विधानसभेसाठी काँग्रेसकडे आ. कदम, आ. सावंत यांच्यासह दहा जणांचे अर्ज

जनप्रवास । सांगली
SANGLI VIDHANSABHA 2024 : विधानसभेसाठी काँग्रेसकडे आ. कदम, आ. सावंत यांच्यासह दहा जणांचे अर्ज : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार पलूस-कडेगाव मतदारसंघातून आ. विश्वजीत कदम, जतमधून जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, सांगलीतून जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्यासह सहा विधानसभा मतदारसंघातून दहा जणांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

SANGLI VIDHANSABHA 2024 : विधानसभेसाठी काँग्रेसकडे आ. कदम, आ. सावंत यांच्यासह दहा जणांचे अर्ज

विधानसभेसाठी प्रदेश काँग्रेसने राज्यातील 288 मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. दि. 10 ऑगस्टपर्यंत अर्ज प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, जत, इस्लामपूर, शिराळा व खानापूर-आटपाडी या आठ मतदारसंघातून इच्छूक असलेल्या उमेदवारांनी दि. 8 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत यांनी केले होते. त्यानुसार गुरूवारी सहा विधानसभा मतदारसंघातून दहा इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामध्ये पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री आ. विश्वजीत कदम, जत विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, सांगलीमधून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मिरज विधानसभा मतदारसंघातून सी. आर. सांगलीकर, माजी नगरसेवक दयानंद सोनवणे व रविंद्र कोलप, शिराळ्यातून शिराळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवी पाटील तर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून वाळवा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मनिषा रोटे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज