rajkiyalive

sangli vidhansabha 2024 : सांगलीतील काँग्रेसचा वाद मिटणार, पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील एकत्र

विजयनगर येथील उद्यानाचे भूमीपुजन

जनप्रवास । सांगली
sangli vidhansabha 2024 : सांगलीतील काँग्रेसचा वाद मिटणार, पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील एकत्र : सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद मिटण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज पाटील यांनी आयोजित केलेल्या विजयनगर येथील उद्यानाच्या भूमीपुजन कार्यक्रमाला हे दोन्ही नेते एकत्र आले होते. यासाठी खा. विशाल पाटील यांनी पुढाकार घेतला.

sangli vidhansabha 2024 : सांगलीतील काँग्रेसचा वाद मिटणार, पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील एकत्र

सांगली विधानसभेच्या उमेदवारवरून काँग्रेस पक्षात शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष सुरू झाला आहे. दोघांचे समर्थक एकमेकांवर सोशल मिडियाच्या माध्यमातून टीका करत होते. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत वाद वाढत चालला होता. काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी दोन्ही नेते व त्यांच्या समर्थकांची एकत्रित बैठक घेऊन वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे समर्थकांनी आता सोशल वॉर थांबला आहे. तर रविवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र आले होते.

माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील यांच्या नावाने विजयनगरातील त्रिमूर्ती व दयानंद हौसिंग सोसायटीच्या खुल्या भूखंडावर पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘सहकार तपस्वी गुलाबराव पाटील स्मृती उद्यानाचा भूमीपूजन व कोनशिला अनावरण सोहळा पार पडला. विजयनगर मधील त्रिमूर्ती व दयानंद हौसिंग हौसिंग सोसायटीच्या 30 गुंठे ओपन स्पेस वर हे उद्यान विकसित होत आहे. खा. विशाल पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पृथ्वीराज पाटील तर प्रमुख उपस्थितीमध्ये जयश्रीताई पाटील होत्या. दोन्ही नेते प्रथमच एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. पृथ्वीराज पाटील यांचा खासगी कार्यक्रम असताना देखील जयश्रीताई पाटील कार्यक्रमाला हजर होत्या.

या कार्यक्रमात जयश्रीताई पाटील म्हणाल्या, सहकार तपस्वी माजी खासदार गुलाबराव पाटील यांच्या नावाने होत असलेले उद्यान हे चांगलेच होणार व विजयनगर भागातील नागरिकांना विशेषतः जेष्ठ नागरिक व लहान मुले आणि महिला यांना उपयोगी पडेल. तर पृथ्वीराज पाटील म्हणाले, उद्यानासाठी शासनाने 1 कोटी 36 लाख मंजूर केले आहेत. संपूर्ण उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे पाच कोटीचा निधी आवश्यक आहे. या उद्यानाचा लाभ सबंध विजयनगर, वानलेसवाडी व प्रभाग क्र.8 मधील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. सिंथेटिक ट्रॅक, हॉल, जिम व हिरवळ आणि झाडी यामुळे आल्हाददायक वातावरण असेल.

जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील हे दोन्ही नेते प्रथमच एकत्र आल्याने काँग्रेसमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक संजय औंधकर, सदाशिव पाटील, राजेंद्र कुंभार, ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक सोनल सागरे, सुभाष चिकोडीकर, नितीन मिरजकर, अजित दुधाळ, अजित खरात, बिपीन कदम, प्रा. एन. डी. बिरनाळे, सनी धोतरे, अशोकसिंग रजपूत, इसाक मुल्ला, अजय देशमुख, प्रशांत देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनिल पाटील, आर्किटेक्ट प्रमोद परीख, ठेकेदार अभिषेक पाटील, आयुब निशाणदार, आशिष चौधरी, प्रशांत अहिवळे आदी उपस्थित होते.

दहा दिवसात उमेदवार ठरणार…
सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील हे दोघांशी स्वतंत्रपणे चर्चा करत आहेत. आठवडाभरात या दोघांमधील वाद मिटेल. तर सांगलीतील काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा दहा दिवसात होण्याची शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज