rajkiyalive

संतोष कदम खून प्रकरण : पसार झालेल्या सिद्धार्थ चिपरीकर अखेर जेरबंद : एलसीबीने कागल येथे आवळल्या मुसक्या.

सांगली :

संतोष कदम खून प्रकरण : पसार झालेल्या सिद्धार्थ चिपरीकर अखेर जेरबंद : एलसीबीने कागल येथे आवळल्या मुसक्या. : कुरुंदवाड येथे सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी सांगलीतील तिघा संशयितांना या पूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य संशयित सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर (रा. सांगलीवाडी) हा खुनानंतर पाच महिने पसार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सिद्धार्थ चिपरीकर याला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथून अटक केली आहे.

संतोष कदम खून प्रकरण : पसार झालेल्या सिद्धार्थ चिपरीकर अखेर जेरबंद : एलसीबीने कागल येथे आवळल्या मुसक्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याचा खून 7 फेब्रुवारी रोजी कुरुंदवाड-नांदणी रस्त्यावर झाला होता. आदल्या दिवशी तो कुरूंदवाड येथे जातो म्हणून तिघांसमवेत मोटारीतून गेला होता. रात्री उशिरा तो परतला नाही. त्यामुळे पत्नीने शहर पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुपारीच त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले.

माहिती अधिकार कार्यकर्ता संतोषच्या खुनामुळे राज्यभर खळबळ उडाली.

संतोष यांनी शासकीय कार्यालयातील काही गैरप्रकार बाहेर काढले होते. महापालिकेतील घोटाळ्यांविरुद्ध आवाज उठवला होता. भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी तो महापालिकेवर मोर्चा काढणार होता. मोर्चाची परवानगीही मिळाली होती. तत्पूर्वीच त्याच्या खुनाची बातमी पुढे आली. या खूनप्रकरणी मोटारीतून गेलेले नितेश वराळे, सूरज जाधव, तुषार भिसे या तिघांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली; तर सिद्धार्थ उर्फ बाबा चिपरीकर आणि शेख हे दोघे पसार झाले होते.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी चिपरीकर याचा शोध घेण्याचे आदेश सांगली पोलिसांना दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक त्याचा शोध घेत होते. यावेळी पथकातील कर्मचारी दीपक गायकवाड यांना चिपरीकर हा कागल येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील कर्मचार्‍यांनी तातडीने त्याठिकाणी सापळा रचून त्याला जेरबंद केले.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी दीपक गायकवाड, बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, अरुण पाटील, संदीप नलवडे, विनायक सुतार यांच्या पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज