rajkiyalive

SHANTISAGAR MAHARAJ PUNYATHITI SAMDOLI : शांती कलशाचे मिरजेतून प्रवर्तन

मिरज/ प्रतिनिधी

SHANTISAGAR MAHARAJ PUNYATHITI SAMDOLI : शांती कलशाचे मिरजेतून प्रवर्तन : प्रथमाचार्य परमपूज्य 108 शांतीसागर मुनी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मिरजेत असलेल्या शांती कलश चे प्रवर्तन समडोळी गावातील जैन श्रावकांच्याकडे करण्यात आले. यावेळी वीर सेवा पदाधिकारी तसेच समडोळी व मिरजेतील जैन श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHANTISAGAR MAHARAJ PUNYATHITI SAMDOLI : शांती कलशाचे मिरजेतून प्रवर्तन

मिरज मध्ये मागील वर्षी शांतिसागर महाराजांची 68 वी पुण्यतिथी संपन्न झाली होती. ज्या गावी पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न होतो. त्या गावात शांतिसागर महाराज यांचा शांतिकलश ठेवला जातो. यावर्षी 69 वी पुण्यतिथीचा कार्यक्रम 5 सप्टेंबर रोजी आचार्य पदारोहण शुभस्थान समडोळी येथे संपन्न होणार आहे. प्रथम आचार्य शांतिसागर जी महाराज यांना आचार्य पद देऊन शंभर वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने समडोळी येथे हा भव्य दिव्य समारंभ संपन्न होणार आहे.

बुधवारी मिरज येथील शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर मध्ये गेली वर्षभर ठेवण्यात आलेला शांतिकलश हा समडोळी ग्रामस्थांच्याकडे प्रवर्तन करण्यात आला. मिरज येथील शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर मध्ये सकाळी भगवंतांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करून सजवलेल्या रथातून शांतिसागर महाराजांची प्रतिकृती तसेच शांतिकलश घेऊन बसण्याचा बहुमान बाळासाहेब चौगुले आणि परिवार यांना मिळाला. शहरातील प्रमुख मार्गावरून वाद्यासह रथामधून ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समडोळी आणि मिरजे मधील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दक्षिण भारत जैन सभेचे नूतन अध्यक्ष भालचंद्र पाटील हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी त्यांचा व समडोळी येथील श्री 1008 शांतिनाथ जैन मंदिर व श्री 1008 महावीर जीन मंदिर चे प्रमुख पदाधिकारी यांचा सत्कार मिरजेतील श्रावकांच्याहस्ते करण्यात आला. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमानंतर शांतिकलश हे समडोळीच्या श्रावकांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सदर शांती कलशाचे प्रवर्तन पुढील आठ दिवस विविध गावात संपन्न होणार असून पाच तारखेला सकाळी नऊ वाजता समडोळी येथे पोहोचणार आहे.

याप्रसंगी वीर सेवा दलाचे सेक्रेटरी अजित भंडे, मुख्य संघटक अरूण पाटील, डॉ. चंद्रकांत चौगुले, समडोळीचे सुरेश पाटील, अशोक मगदुम, संजय सगोंडा, महाबल मुंडे, अभय पाटील, सतीश पाटील आदी तसेच अनेक श्र्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वीर सेवा दलाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज