rajkiyalive

SHANTISAGAR MAHARAJ : सप्तम पट्टाधीश प.पू.अनेकांतसागर महाराज यांचे समडोळीत 7 रोजी जंगी स्वागत होणार

SHANTISAGAR MAHARAJ : सप्तम पट्टाधीश प.पू.अनेकांतसागर महाराज यांचे समडोळीत 7 रोजी जंगी स्वागत होणार मिरज तालुक्यातील समडोळी येथील श्र्री 1008 भ. शांतीनाथ दिगंबर जिन मंदिरच्यावतीने 20 व्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य शताब्दी समारोहानिमित्त भव्य चातुर्मासचे आयोजन करण्यात आले आहे. या चातुर्माससाठी समडोळी या पुण्यनगरीमध्ये आचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या अक्षुण्ण परंपरेतील सप्तम पट्टाधीश प. पू. आचार्य श्री 108 अनेकांतसागर महाराज हे रविवार 7 जुलै समडोळी नगरीत येणार आहेत. त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी सांगितले. यावेळी मंदिर कमिटीचे सर्व सदस्य आणि चातुर्मास कमिटीचे सर्व सदस्य उपस्थि होते.

SHANTISAGAR MAHARAJ : सप्तम पट्टाधीश प.पू.अनेकांतसागर महाराज यांचे समडोळीत 7 रोजी जंगी स्वागत होणार

आचार्य शांतीसागरजी महाराज यांना 1924 च्या दसर्‍या दिवशी समडोळीत आचार्य ही पदवी देण्यात आली होती. वीसाव्या शतकातील प्रथमाचार्य अशी त्यांची ओळख आहे. त्या समारंभाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून समडोळी नगरीत भरगच्च कार्यक्रम होत आहेत. यंदाच्या चातुर्माससाठी सप्तम पट्टाधीश अनेकांतसागर महाराज हे दिल्लीहून समडोळीत येत आहेत. येणार्‍या चार महिन्यात अनेक मोठ मोठे कार्यक्रम होणार आहेत.

रविवार 7 जुलै रोजी सकाळी 7 वा. 45 मिनिटांनी त्यांचे समडोळीत आगमन होणार आहे.

यावेळी त्यांच्या भव्य स्वागताची तयारी समडोळीकरांनी केली आहे. कलशस्थापनेचा सवाल रविवार 21 जुले होणार असल्याचे त्यांनी सांगितले. चातुर्मासच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी स्वस्तिश्र्री जिनसेनजी भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी, स्वस्तिश्र्री लक्ष्मीसेनजी भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, कोल्हापूर, स्वस्तिश्री धवलकिर्ती, स्वस्तिश्री चारूकिर्ती, स्वस्तिश्री चारूकिर्ती, स्वस्तिश्री रविंद्रकिर्ती महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

तसेच या कार्यक्रमासाठी डॉ. खा. वीरेंद्रजी हेगडे, धर्मस्थळ, सौ. हेमवती हेगडे या विशेष अतिथी असणार आहेत. दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, उपाध्यक्ष शशिकांत राजोबा, वीर सेवादलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रा. डि. ए. पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रतिष्ठाचार्य म्हणून अजितकुमार उपाध्ये कोथळी आणि संदेश उपाध्ये नेज हे काम पाहणार आहेत. सुयोग पाटील दानोळी यांची संगीत साथ लाभणार आहे.

या सर्व कार्यक्रमाचे आयोजन शांतिनाथ जिन मंदिर, आदिनाथ जिन मंदिर, भ. महावीर जिन मंदिर, शांतीसागर चॅरिटेबल ट्रस्ट, दोन्ही वीर सेवा दल, वीर महिला मंडळ आणि सकल जैन समाज समडोळी यांनी केले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज