rajkiyalive

shantisagar maharaj shatabdi mahotsav : 42 गावांच्या उपस्थितीत समडोळीत शांतीसागर विधान उत्साहात

दिनेशकुमार ऐतवडे

shantisagar maharaj shatabdi mahotsav : 42 गावांच्या उपस्थितीत समडोळीत शांतीसागर विधान उत्साहात : विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य शताब्दी महोत्सवानिमित्त मिरज तालुक्यातील समडोळी येथे आयोजित करण्यात आलेल्या चातुर्मास पावन वर्षायोगमध्ये श्रावक श्राविकांचा महापूर पहायला मिळाला. निमित्त होते श्री 1008 भ. महावीर जिन मंदिरच्यावतीने सुरू असलेल्या पावन वर्षायोगमधील कार्यक्रमाचे.

shantisagar maharaj shatabdi mahotsav : 42 गावांच्या उपस्थितीत समडोळीत शांतीसागर विधान उत्साहात

आचार्य सन्मतीसागर महाराज यांचे परम प्रभावक शिष्य निर्यापक श्रमण 108 धर्मसागर महाराज, निर्यापक श्रमण 108 विद्यासागर महाराज, 108 अजितसागर महाराज, 108 आगमसागर महाराज आणि 108 अनेकांतसागर महाराज यांच्या उपस्थितीत चातुर्मास सुरू आहे. या चातुर्मासमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी 25 रोजी शिरगुप्पी, मांजरी या कर्नाटकातील गावांबरोबरच रांगोळी, यळगूड, कसबे डिग्रज, सावळवाडी, माळवाडी, डिग्रज, दुधगव, कवठेपिरान, देसाई इंगळी, कोरोची, इचलकरंजी, नांद्रे यासह 42 गावातील श्र्रावक श्राविकांनी उपस्थितीत मोठा कार्यक्रम झाला.

समडोळीमध्ये भक्तांचा महापूर आल्यासारखे वाटत होते. यावेळी प्रत्येक गावातील भाविक ओळीने येवून अर्ग्य देत होते. भक्तांना सावरणे संयोजकांना अडचणीचे होत होते. गावाबाहेर पार्किगची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी महाराजांचे पादपूजन आणि शास्त्रदानचा मान वाळव्याचा होरे कुटुंबीयांना मिळाला. शिरगुप्पी येथील महिला मंडळ आणि समडोळी येथील विजय पाटील बालाप परिवाराला आरतीचा मान मिळाला. दुपारच्या सत्रात महाराजांचे मंगल प्रवचन झाले.

सकाळच्या सत्रात गावातील श्रावक श्र्रावकांचे विधानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरेश पाटील कुटुंबीयांना यजमानपदाचा मान मिळाला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज