rajkiyalive

sharad pawar news : पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे 9 उमेदवार पडले

sharad pawar news : पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे 9 उमेदवार पडले :  या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवर विजय मिळवता आला. बड्या पक्षांच्या यादीतील शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांत तळात गेली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे पिपाणी चिन्हाचा फटका विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाला बसल्याचे समोर येत आहे. पिपाणी चिन्हाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून अनेक अपक्ष उमेदवारांनी पिपाणी चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. चिन्हाच्या घोळाचा या निवडणुकीतही शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार नऊ ठिकाणी पडल्याचे दिसून आले आहे.

sharad pawar news : पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे 9 उमेदवार पडले

पिपाणी आणि तुतारी या चिन्हांमध्ये मतदारांचा घोळ झाला. त्यामुळे जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव पारनेर, केज, परांडा या नऊ मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत झाले. या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला, त्यापेक्षा जास्त मते पिपाणीला मिळाली आहेत. यावरून मतदारांनी पिपाणीलाच तुतारी समजून मतदान केल्याची चर्चा रंगू लागली आहे.

शहापूर मतदारसंघात शरद पवार गटाकडून पांडुरंग बरोरा निवडणूक रिंगणात होते. बरोरा यांचा 1672 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला 3892 मते मिळाली. परिणामी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.

बेलापूर मतदारसंघात अटीतटीची लढत झाली. शरद पवार गटाचे संदीप नाईक यांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला 2860 मते पडली. या ठिकाणी भाजपाच्या मंदा म्हात्रे या विजयी झाल्या.
अणुशक्ती नगर मतदारसंघात शरद पवार गटाकडून फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा 3378 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला 4075 मते मिळाली. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक विजयी झाल्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज