शिराळा /प्रतिनिधी
शिराळा मतदार संघात 67.47 टक्के मतदान : हातकणंगले लोकसभेसाठी संपन्न झालेली तिसर्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. शिराळा विधानसभा मतदारसंघातील 334 केंद्रावर कार्यकर्ते, कर्मचारी व मतदार यांची लगबग सुरू होती. सकाळी साडेदहापर्यंत मतदारांची संख्या कमी प्रमाणात होती. परंतु अकरा नंतर मतदारांनी बुथवर गर्दी केली. गत निवडणुकीत 67.53 टक्के मतदान झाले होते. तर यावर्षी 67.47 टक्के मतदान झाले.
शिराळा मतदार संघात 67.47 टक्के मतदान
यावेळी 1 लाख 52 हजार 428 पुरष मतदार होते. यातील 1 लाख 30 हजार 829 मतदानाचा हक्क बजावला. तर 1 लाख 44 हजार 790 महिला मतदान पैकी 96 हजार 648 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच तीन तृतीय पंथी पैकी एकाने मतदानाचा हक्क बजावला. 2 लाख 97 हजार 221 पैकी 2 लाख 541 मतदारांनी आपल्मया मतदानाचा हक्क बजावला.
सकाळ पासूनच प्रशासकीय अधिकार्यांसह आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख, शिराळा विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक, रणधीर नाईक , विराज नाईक यांच्यासह उमेदवार सत्यजित पाटील, राजु शेट्टी यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 1 उपविभागीय पोलीस अधीक्षक,2 पोलीस पोलीस निरीक्षक, 18 इतर पोलीस अधिकारी, 399 पोलीस,276 होमगार्ड , एस.आर.पी व सी.आर.पी.बी.एस.एफची प्रत्येकी एक तुकडी असा सुमारे 77 हून अधिक कर्मचार्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष 334 मतदान अधिकारी 1,2,3, व एक शिपाई असे 1336 जणांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी फिरते पथक नेमण्यात आले होते. यामध्ये 33 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले होते.तर क्षेत्रीय अधिकारी 31 नेमण्यात आले. कर्मचार्यांची ने-आण करण्यासाठी 51 एसटी बस,17 जिप गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. सर्व वाहनावर जी,पी.एस.बसवण्यात आले होते. क्रिटीकल मतदान केंद्र,1200 हून अधिक मतदान असणार्या व दोन पेक्षा जास्त मतदान केंद्र असणार्या 167 ठिकाणी वेब कॅमेरे बसवण्यात आले होते.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण पाटील व डॉ राजमाने यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन आरोग्याची चौकशी केली. तर रेड (ता.शिराळा) येथील मतदान केंद्र 179 ची दिव्यांग मतदान केंद्र म्हणून निवड आली होती. तर त्या ठिकाणी फक्त दिव्यांग कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली होती.सदर ठिकाणी सेल्फी पॉईंटची सुविधा उपलब्ध करून फुग्यांची सजावट ही केली होती.
शिराळा येथील मतदान केंद्र 220 हे महिला मतदान केंद्रांची स्थापना करून येथे फक्त महिला कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कोकरूड येथील मतदान केंद्र 204 यास निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आवश्यक असणार्या सर्व सुविधा उपलब्ध असणारे आदर्श मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती. याचबरोबर मिरुखेवाडी येथील मतदान केंद्र 37 ची युवा मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती.
त्या ठिकाणी फक्त युवा कर्मचार्यांची नियुक्ती युक्ती केली होती. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणा घराची सोय करण्यात आली होती. तहसीलदार शामला खोत-पाटील यांनी असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले होते.शिराळा विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजता 6.6 तर 1 वाजता 34. 98 तसेच पाच वाजता 59.95 टक्के मतदान झाले.
दिव्यांग मतदारांचा चांगला प्रतिसाद
जिल्हाधिकारी राजा दयानिधी, तहसीलदार शामला खोत-पाटील, चाचरकर, मंजिरी देशपांडे समाज कल्याण विभाग सांगली यांच्या आदेशान्वये शिराळा लोकसभा मतदार संघातील दीव्यांग मतदारांसाठी मतदार संघातील सागांव, नाटोली चिखली, भाटशिरगाव, बिऊर, पावलेवडी, शिराळा, रेड या ठिकाणी जाऊन मूकबधिर, अस्थिव्यंग, अंध, मतिमंद आणि इतर अशा दिव्यांगांना मतदान कसे करावे तसेच त्यांना ने आण करण्यास मदत तसेच मतदान केंद्रावर व्हील चेअर व्यवस्था स्वयंसेवक अनघा जोशी बधिर मूक विद्यालय शिराळा यांनी दुभाषिक म्हणून मार्गदर्शन केले. तर अमित भराडे,विजय खेडेकर बधिर मूक विद्यालय शिराळा यांनी तालुका समन्वयक म्हणून काम पाहिले. तर प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,स्वंयसेवक,ब्रेल लिपी या सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
त्वरित मतदान प्रक्रिया सुरू
सुरूवातीला सकाळी कापूस खेड, आरळा व पुनवत येथे मशीन बंद पडल्याची घटना घडली परंतु प्रशासकीय अधिकार्यांनी त्वरित मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरू केली.
एक जण मतदान प्रक्रियेपासून वंचित तर एका महीलेस दिली परवानगी*
शिराळा येथील विनय रामचंद्र हसबनिस, यांचे वडील रामचंद्र हसबनिस, आई पुष्पा हसबनिस व चुलत भाऊ विजय वसंत हसबनिस, हे तिघे मयत झाले आहेत. मतदान यादीतून नाव काढण्यात यावे यासाठी सर्व प्रक्रिया केल्या आहेत. परंतु प्रशासकीय अधिकार्यांच्या नजरचुकीने विनय हसबनिस यांच्या आई वडील व चुलत भाऊ या मयत नातेवाईकांचा मतदार यादीत समावेश आहे. परंतु विनय हसबनिस यांचेच मतदार यादीतून नाव गायब झाले आहे. याचबरोबर भारती जयवंत पाटील या नेर्ले (ता वाळवा) या 60 वर्षीय महिलेचे ही नावं मतदार यादीतून गायब झाले होते. यामुळे ग्रामस्थांनी सदर महीलेस मतदानाचा हक्क मिळावा यासाठी विचारणा केली. यावेळी संबंधित अधिकार्यांनी सदर महिलेस मतदानाची लेखी परवानगी दिली. परंतु हसबनिस यांना परवानगी मिळाली नाही.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.