rajkiyalive

shirdhon accident news : भीषण अपघातात शिरढोणच्या ट्रॅव्हल्स चालकासह तिघेजण ठार :

सातारा-लोणंद मार्गावर सालपे नजीक अपघात; 8 जण जखमी

shirdhon accident news : भीषण अपघातात शिरढोणच्या ट्रॅव्हल्स चालकासह तिघेजण ठार : : इचलकरंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्स मधुन उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना भीषण अपघात होऊन तीनजण ठार तर आठजण जखमी झाले. लोणंद – सातारा रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रव्हल्स व ट्रकचा समोरा-समोर भीषण अपघात झाला. यामध्ये ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय 24) रा.माळभाग पाटील गल्ली गणेश नगर शिरढोण तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, रजनी संजय दुर्गुळे (वय 48) रा.पेठ वडगाव तालुका हातकणंगले अशी मृतांची नावे असून अन्य मयत महिलेचे व जखमींची नांवे समजू शकली नाहीत.हा अपघात रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

shirdhon accident news : भीषण अपघातात शिरढोणच्या ट्रॅव्हल्स चालकासह तिघेजण ठार :

या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले, तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. इचलकरंजी परिसरातील ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच 04 सीपी 2452 ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती.

ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपेचा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. याच दरम्यान लोणंद बाजूकडून साताराकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 42 बीएफ 7784 हा सालपे गावाजवळील एका वळणावर समोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला.या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

shirdhon-accident-news-three-people-including-the-driver-of-shirdhons-travel-company-died-in-a-terrible-accident

अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज