rajkiyalive

शिरोळ तालुक्यात सुमारे 68.95% उस्फूर्तपणे मतदान

2 लाख 18 हजार 931 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

जयसिंगपूर/ प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात सुमारे 68.95% उस्फूर्तपणे मतदान : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमधील शिरोळ विधानसभा मतदारसंघात आज एकूण 68.95% इतके उत्स्फूर्तपणे मतदान झाले. आज मंगळवारी तालुक्यातील 296 मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. 1 लाख 58 हजार 158 पुरुष मतदारांपैकी अंदाजे 1 लाख 22 हजार 61 तर 1 लाख 58 हजार 628 महिला मतदारांपैकी अंदाजे 96 हजार 868 इतक्या मतदारांनी 2 तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 3 लाख 17 हजार 490 मतदारांपैकी 2 लाख 18 हजार 931 इतके दिवसभरात मतदान झाले. काही मतदान केंद्रावरती अंतिम क्षणी मतदारांनी गर्दी केल्याने मतदान प्रक्रिया पार पडण्यास विलंब झाल्याने मतदानाची टक्केवारीची नोंदणी घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

शिरोळ तालुक्यात सुमारे 68.95% उस्फूर्तपणे मतदान

मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून प्रत्येक शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सकाळी संथ गतीने सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजता एकूण 68.95% इतके मतदान झाले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले दुपारी उन्हाचा पारा अधिक असल्याने काही ठिकाणी मतदान केंद्र ओस पडली होती. सायंकाळी 4 नंतर पुन्हा मतदानासाठी मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा दिसू लागल्या. आज नवमतदारांबरोबर युवक युवती महिला पुरुष यांच्यासह ज्येष्ठ नागरिक वृद्ध विकलांग यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा पवित्र हक्क बजावला. आपल्या जीवनात पहिले मतदान केलेला आनंद नवमतदारांच्या चेहर्‍यावरून ओसांडून वाहत होता. लोकशाही बळकट करण्यासाठी आम्हाला मिळालेला पहिला मतदानाचा हक्क बजावल्याचे समाधान लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक मतदार केंद्रावरती मतदान करून घेण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते दिवसभर ठाण मांडून बसले होते यामुळे हा परिसर गर्दीने फुलून गेला होता किरकोळ शाब्दिक बाचाबाची वगळता सर्वत्रच मतदान प्रक्रिया उस्फुर्त व शांततेत पार पडली

स्वाभिमानीचे उमेदवार व माजी खासदार राजू शेट्टी यांनी जनता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील मतदान केंद्रावर सहपरिवार येऊन मतदानाचा हक्क बजावत आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान केले

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी शिरोळ तालुक्यात 296 मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती. यासाठी 1758 अधिकारी व कर्मचारी तसेच 36 झोनल अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. शिरोळ तहसील कार्यालयात सीयु – 415, बीयु – 715 व व्हीई पॅड 399 इतके मशीन व मतदानासाठी लागणार्‍या साहित्याची मतदान केंद्रावर व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता मतदान केंद्राबाहेर मंडप उभारण्यात आला होता. तसेच मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घ्यावा यासाठी अनेक मतदान केंद्रात स्वागत कमानी उभा करून सजावट करून आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आली होती. अनेक ठिकाणी मतदारांच्यासाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. मतदान केलेल्या मतदारांनी त्या ठिकाणी फोटो काढून मतदान करण्याचे आवाहन केले प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

शिरोळ तालुक्यात 1 लाख 58 हजार 158 पुरुष मतदार तर 1 लाख 58 हजार 628 महिला मतदार असे मिळून 3 लाख 17 हजार 490 मतदार असून यापैकी आज 2 लाख 18 हजार 931 एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदान प्रक्रिया प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. अपवाद वगळता काही ठिकाणीच तांत्रिक बिघाडामुळे मतदान यंत्र बंद पडली होती तात्काळ मतदान यंत्र बदलून पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली

शिरोळ तालुक्यामध्ये 54 गावातील 296 मतदान केंद्रावर. मतदान प्रक्रियेच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस तैनात करण्यात आला होता मतदान केंद्रावरती मतदान साहित्यासह कर्मचार्‍यांना जाण्यासाठी व मतदान प्रक्रिया झाल्यानंतर येण्यासाठी आवश्यक त्या वाहनांची सोय करण्यात आली होती
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वच मतदान केंद्रावरील मतदान यंत्र सीलबंद करून एका मतपेटीत बंद करून त्या पोलीस बंदोबस्तात स्ट्राँग रूम मध्ये आणण्यात आल्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज