sudhir gadgil news : सांगलीतील खोकीधारकांचे जागेवरच पुनर्वनस आ. सुधीर गाडगीळ यांची गाळेधारकांना ग्वाही : सांगली शहरासह मतदारसंघातील खोकीधारकांचे जागेवरच पुनर्वसन केले जाईल. जिथे मूळच्या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नसेल तिथे मात्र त्यांना सोयीच्या ठिकाणी जागा दिली जाईल, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.
येथील गणेश मार्केटमध्ये तेथील गाळेधारक तसेच शहरातील खोकीधारक यांच्या बैठकीत आमदार गाडगीळ बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार होते.
sudhir gadgil news : सांगलीतील खोकीधारकांचे जागेवरच पुनर्वनस आ. सुधीर गाडगीळ यांची गाळेधारकांना ग्वाही
आमदार गाडगीळ म्हणाले, गाळेधारक आणि खोकी धारक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे आपण एक पद्धतच ठरवून घेऊ. खोकीधारकांचा पुनर्वसनाचा जो विषय आहे तो महापालिका तसेच जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा करून आपण मार्गी लावू. गाळेधारक आणि खोकीधारक यांच्या भाड्याचा, घरपट्टीचा तसेच अन्य करांचा विषय सुद्धा महापालिकेत तातडीने बैठक घेऊन मार्गी लावू. महापालिकेतील बैठकीत हा विषय चर्चेला घेऊ आणि त्यानंतर राज्य शासनाकडे जाऊन याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ.
दुकानगाळे हे धारकांच्या मालकीचे करण्याबाबतचा विषयसुद्धा तातडीने मार्गी लावला जाईल. भाडे घरपट्टी अथवा कोणताही कर हा अवाजवी असणार नाही, यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करु. भाडे किंवा घरपट्टीच्या थकबाकीबद्दल सुद्धा महापालिकेत तातडीने बैठक घेऊ.
पृथ्वीराज पवार म्हणाले, सुधीरदादांनी सांगली मतदारसंघासाठी चार हजारावर कोटी रुपये आणले आहेत. त्यामुळे खोकी धारकांसाठी ते निश्चितच शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळवू शकतील. सांगली शहरात योग्य जागा बघून त्या त्या ठिकाणी गाळेधारकांसाठी आणि खोकेधारकांसाठी कॉम्प्लेक्स उभे करावेत अशी आमची मागणी आहे. त्यासाठी दादा शासनाकडून निधी आणू शकतील.
गाळेधारक आणि खोके धारक संघटनेचे अध्यक्ष गणेश कोडते यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. ते म्हणाले, माजी आमदार स्वर्गीय संभाजी पवार यांनी गाळेधारक तसेच खोकेधारकांना नेहमीच पाठबळ दिले होते. त्याचप्रमाणे आमदार सुधीर गाडगीळ आणि पृथ्वीराज पवार हे सुद्धा आमच्या पाठीशी सतत उभे असतात. महापालिकेकडून अवाजवी घरपट्टी आणि भाडे आकारले जाते. ते कमी करून मिळावे, अशी आमची मागणी आहे. यापूर्वीची थकबाकीही रद्द व्हावी तसेच खोके धारकांसाठी राज्य शासनाने महामंडळ स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय शिंदे, अल्ताफ शेख, विनायक साळस्कर, गणेश कांबळे, सतीश पवार आदी उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.