sugarcane prise news : पंचगंगाची सर्वाधिक 3300 रूपये पहिली उचल: कोल्हापूर जिल्ह्यात 23 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असला तरी केवळ चारच कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करून गाळप – चालू ठेवले आहे. ’जवाहर’, ’पंचगंगा’, ’दत्त’ व ’गुरुदत्त’ या कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली असून, यामध्ये ’पंचगंगा’ कारखान्याची सर्वाधिक उचल प्रतिटन 3300 रुपये आहे.
sugarcane prise news : पंचगंगाची सर्वाधिक 3300 रूपये पहिली उचल
शेजारील कारखान्यांची उचल आणि बँकांकडून मिळणारा पैसे याचा अंदाज घेऊनच इतरांचा निर्णय राहणार आहे.शासनाने हंगाम 2024-25 साठी 10.25 टक्के बेसीक उतार्यास प्रतिटन 3400 रुपये एफआरपी निश्चित केली आहे. जिल्ह्यातील 14 सहकारी व 9 खासगी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा हंगाम उशिरा सुरू झाल्याने उसाची उचलीलाही उशीर होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या नजरा पहिल्या उचलीकडे लागल्या आहेत. ’दत्त- शिरोळ’ व ’गुरुदत्त-टाकळीवाडी’ या कारखान्यांनी उचल जाहीर करूनच तोडण्या सुरू केल्या.
प्रतिवर्षी एकरकमी उचल जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखानदारीवर मोठा दबाव असे परंतु यंदा संघटनेचे वेगवेगळे नेते परस्पर कारखानदारांनाच अगोदर भेटून किती उचल द्यावी याचे मार्गदर्शन करू लागली आहेत. त्यामुळे एकत्रित संघटनेचा जो दबाव होता तो पूर्ण निष्फळ ठरला आहे.
हंगाम 2024-25 मधील एफआरपी, प्रतिटन
कारखाना 2023-24 उतारा तोडणी-ओढणी देय एफआरपी
आजरा 12.42 782 3338
भोगावती 12.32 611 3476
राजाराम 11.60 667 3381
शाहू 12.08 759 3248
दत्त 12.14 724 3303
बिद्री 12.55 797 3366
जवाहर 12.15 742 3288
मंडलिक 11.55 705 3127
कुंभी 12.83 648 3408
पंचगंगा 12.70 708 3505
शरद 12.06 740 3260
वारणा 11.22 683 3048
गायकवाड 11.61 783 3069
डी. वाय. पाटील 12.38 742 3365
दालमिया 13.35 803 3626
गुरुदत्त 12.46 809 3325
युको क्रेन 12.72 825 3395
आलेम 12.46 779 3355
संताजी घोरपडे 11.72 861 3027
फराळे 12.51 979 3171
गडहिंग्लज 12.49 645 3471
यांनी केली उचल जाहीर
पंचगंगा (रेणुका शुगर्स) इचलकरंजी – 3300
गुरुदत्त, टाकळीवाडी – 3150
जयाहर, हुपरी – 3150
दत्त, शिरोळ – 3140
*’स्वाभिमानी’ची 3700 रुपयांची मागणी*
’स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने यावर्षी प्रतिटन 3700 रुपये दराची मागणी केली आहे. साखर आयुक्त व जिल्हाधिकार्यांच्या पातळीवर त्यांची सध्या मागणी रेटण्याचा प्रयत्न असून, आंदोलनाची धार किती राहणार यावरच, पहिल्या उचलीचे भवितव्य अवलंबून राहणार हे निश्चित आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.