आ. सुहास बाबरांचा वैभव पाटलांवर जोरदार पलटवार ; अंमली पदार्थांची तस्करी करणारे विट्यातून हद्दपार करणार
suhas babar on vita drugs news : विट्यातील ड्रग्ज प्रकरणाचा आकाचा आका कोण ? : ड्रग्ज प्रकरणाच्या मुळापर्यंत मी गेलो नाही तर या घटना परत परत घडतील. आणि त्याची भली मोठी किंमत विटा शहराला मोजावे लागेल. ती मोजायला लागू नये म्हणून प्रसंगी मला कितीही संघर्ष करावा लागला कितीही संकट माझ्यावरती आले तरी देखील मी या ड्रग्ज प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु ड्रग्ज, अंमली पदार्थांची तस्करी करणारे लोक विट्यातून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
suhas babar on vita drugs news : विट्यातील ड्रग्ज प्रकरणाचा आकाचा आका कोण ?
विट्यातील ड्रग्ज प्रकरणाचा आकाचा आका कोण? अटक केलेल्या मुलाला बस्तान बसवण्यासाठी कोणी मदत केली ? त्या मुलाच्या फायनान्स कंपनीमध्ये कुणाचा फोटो आहे. कुणी त्याच्या फायनान्स कंपनीचे उद्घाटन केले आहे ? असे अनेक सवाल आणि आरोप करत आमदार सुहास बाबर यांनी माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी नगरसेवक अमर शितोळे, माजी नगरसेवक कृष्णत गायकवाड, पलू साठे, रामचंद्र भिंगारदेवे उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, तुमच्या अपेक्षा आहेत की मी असं करायला पाहिजे माझ्यावर आरोप करत असताना विधानसभा निवडणूकीवेळी मतदारसंघाने तुम्हाला नाकारले म्हणून एका झटक्यात लगेच सोडता. उडता खानापूर, उडता विटा म्हणून विटा शहराची आणि मतदारसंघाची बदनामी करू नका. एखादी घटना घडल्यानंतर तपास यंत्रणा त्यांच्या पध्दतीने तपास करत असते. त्या यंत्रणेला माझ्या एका वक्तव्यावरून किंवा एखाद्या कृतीमुळे त्या तपासामध्ये व्यत्य यायला नको. म्हणून मी गप्प होतो.
विटा एमडी ड्रग्ज प्रकरणी विट्यातील महिलेला केली अटक : पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर करार करून कारखाना दिला भाड्याने.
पण त्या घटनेच्या खोलापर्यंत जाऊन सखोल तपास व्हावा म्हणून ज्या गोष्ठी आमदार म्हणून मी करायला पाहिजे होत्या. त्या सगळ्या गोष्टी घटना घडल्यापासून ते या क्षणापर्यंत आमदार म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित यंत्रणेशी माझं बोलणं चालू आहे मी काही लोकांना भेटलोय. त्यामुळे मला असं वाटतं फक्त पत्रकार परिषद घेऊन ही गोष्ट साध्य होत नसते त्यासाठी जबाबदारी घेऊन काम करावं लागतं. आणि ती जबाबदारी मी घेतली आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा नियोजन समिती ही काय हा विषय मांडण्याची सभा आहे का ? मी गेल्या सहा वर्षापासून जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करत आहे.
याउलट ते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कधी नव्हते त्यांनी काम केलं नसल्यामुळे त्यांना त्या नियोजन समितीच्या कामकाजाची पद्धत माहीत नाही. प्रशासनामध्ये त्यांचा अभ्यास कमी आहे किंवा त्या गोष्टींची त्यांना जाणीव नाही. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून प्रशासन गतिमान करण्यासाठी सर्व शासकीय विभागांचे अधिकारी त्या बैठक आणि गृह खात्याचे सर्व अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. कवठेमंकाळमध्ये सुद्धा ड्रग्ज सापडले होते. सांगली मिरजमध्ये मोठी कारवाई झाले होती.
अंमली पदार्थ जिल्ह्यातून हद्दपार झाली पाहिजेत या हेतूने त्याठिकाणी चर्चा चालू होती. त्या विषयावरती टास्क फोर्स तयार झालं पाहिजे आणि टास्क फोर्स करण्याची मागणी सगळ्या आमदारांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्यावर लगेच चंद्रकांदादांनी तातडीने अँक्शन घेतली आणि एक टास्क फोर्स या ड्रग्जच्या विषयावर तयार केला.
त्यामुळे जिल्हा नियोजन समितीत या विषयावर चांगली चर्चा होऊ शकते आणि नियोजन समिती हे विषय मांडण्याचं अत्यंत चांगलं व्यासपीठ आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये हा मुद्दा मांडून त्याच्यावरती कारवाई करून घेणं हे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती ती मी पार पाडली. विधानसभेची निवडणूक निकाल लागून अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पण आता काहीच मिळत नाही त्यामुळे प्रशासनाला टार्गेट करून तुम्ही माझ्यावरती आरोप करत आहात, पण माझ्यावरती खुशाल आरोप करा. आपले राजकीय अस्तित्व टिकले पाहिजे यासाठी तुमचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
ज्या विटा शहराचं गेली 40 वर्षे नेतृत्व करत आहात. माझ्यावर आरोप करत असताना विटा शहराची आणि खानापूर मतदारसंघाची बदनामी करू नका त्या इथल्या मतदारसंघातली जनतेची बदनामी करू नका. कारण तुमचं एक वक्तव्य विटा शहरात राहणार्या, व्यवसाय करणार्या लोकांच्या तसेच शिक्षणासाठी येणार्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनावरती खोल जखम होण्याची शक्यता आहे आणि ती परत आपण कधीही भरून काढू शकणार नाही. त्यामुळे विटा शहराची आणि खानापूर मतदारसंघाची बदनामी करू नका त्या इथल्या मतदारसंघातली जनतेची बदनामी करू नका. 40 वर्षे नेतृत्व करत असलेल्या विटा शहराला एका वेगळ्या ठिकाणी नेवून ठेवायचा प्रयत्न कशासाठी करताय ?
ते पुढे म्हणाले, सामाजिक संघटनांनी एकत्र येवून शाळा, कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करूया, अशी तुम्ही अपेक्षा व्यक्त केली, ही गोष्ट चांगली आहे. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यांमध्ये याबाबत निर्णय झाला आहे. माझा निवडणूकीचा काळ हा फक्त 10 दिवसाचा असतो. मतदान आणि निकाल झाल्यानंतर मी सर्वांचा लोकप्रतिनिधी या नात्याने काम करत आहे. माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल द्वेष नाही.
तुम्ही एखादी सूचना अथवा अपेक्षा व्यक्त केली तर त्याविषयी मला अजिबात गैर वाटत नाही. ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. मी एवढ्यावरती थांबणार नाही कारण आता आपण जर कडक वागलो नाही आपण या प्रकरणाच्या मुळापर्यंत नाही गेलो तरी या घटना परत परत घडतील. आणि त्याची भली मोठी किंमत विटा शहराला मोजावे लागेल ते मोजायला लागू नये म्हणून प्रसंगी मला कितीही संघर्ष करावा लागला कितीही संकट माझ्यावरती आले तरी देखील मी या ड्रग्ज प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्रग्जच्या प्रकरणातील अटकेतील मुलाचे कुणाशी लागेबंध ?
विटा शहरांमध्ये तीस कोटीचं ड्रग्ज सापडतात, ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना एमआयडीसीमध्ये चालू आहे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही, ही गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखी आहे. सर्व राजकीय नेत्यांनी एका गोष्टीचे भान ठेवलं पाहिजे. पोलिसांनी नशेची इंजेक्शन विकणार्या टोळीतील आरोपींचे फोटो कुणाच्या बॅनरवर होते हे सर्वांना ज्ञात असणे महत्वाचे आहे. ती टोळीतील व्यक्ती कुणाशी संबंधित आहे ? कुणाशी लागेबंध आहेत. ड्रग्जच्या प्रकरणामध्ये ज्या मुलाला अटक झाली आहे. त्याचे लागेबंध कुणाशी आहेत ? ज्या मुलाला अटक झाली आहे? तो मुलगा किती वर्षापुर्वी विट्यात आला आहे ? त्याला बस्तान बसवण्यासाठी कोणी मदत केली? त्या 22-23 वर्षाच्या मुलाकडे एवढे पैसे आले कोठून? तो फायनान्स कंपनी सुरू करतो ? त्या मुलाच्या फायनान्स कंपनीमध्ये कुणाचा फोटो आहे. कुणी त्याच्या फायनान्स कंपनीचे उदघाटन केले आहे ? याचा शोध घेऊन प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांनी करावा.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



