rajkiyalive

sujit minchekar news : मिणचेकरांच्या कोलांटउडीने ना फायदा ना तोटा.

sujit minchekar news : मिणचेकरांच्या कोलांटउडीने ना फायदा ना तोटा. : हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम करत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचा फायदा किती? होणार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तोटा किती? होणार हे आता पहावे लागणार आहे. स्वाभिमानीची पायवाट मळण्यापूर्वी मिणचेकरांनी साथ सोडली. यामुळे संघटनेवर यत्किंचितही परिणाम झाल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांना वाटत नाही.

sujit minchekar news : मिणचेकरांच्या कोलांटउडीने ना फायदा ना तोटा.

2009 आणि 2014 या दोन टर्ममध्ये विधानसभा निवडणुकीत माजी आमदार मिणचेकर यांनी हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अधिपत्याखालील असलेल्या या शिवसेनेत त्यांना मोठी संधी मिळाली. त्यातच त्यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) या संघाचे प्रतिनिधित्व करण्यास संधी मिळाली. 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून ही निवडणूक लढवली होती.

2024 च्या निवडणुकीत त्यांनी पूर्वाश्रमीच्या शिवसेनेला रामराम करत राजू शेट्टी यांच्या अधिपत्याखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून ही निवडणूक लढवली होती. तरीही शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र या निवडणुकीत पहावयास मिळाले. विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांनी पुन्हा खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शिवसेनेत आता नुकताच प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे गटाच्या आणि मिणचेकर गटाच्या कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे स्वाभिमानीला खिंडार असे चित्र कार्यकर्त्यांनी निर्माण केले असल्याचे बोलले जात आहे.

sujit-minchekar-news-minchekars-kolantudi-has-neither-profit-nor-loss

मिणचेकर कशा पद्धतीने नियोजन करतात हे आता पहावे लागणार आहे.

पण महायुतीमध्ये असलेल्या तीन घटक पक्षांच्या राज्यात मिणचेकरांच्या मुळे मतदारसंघात सामान्य जनतेला किती फायदा होणार हे मात्र भविष्य काळात दिसून येणार आहे. या मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार अशोकराव माने हे सध्या प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या कामाचा निपटारा पाहिला तर ते धडाक्यात सुरू आहे. पण मिणचेकर कशा पद्धतीने नियोजन करतात हे आता पहावे लागणार आहे. माजी आमदार मिणचेकर यांना मतदारसंघात आपला ठसा उमटवायचा असेल तर वेगळ्या पद्धतीची खेळी खेळून विकासाभिमुख कामे शासनाकडून खेचून आणली तरच त्यांचा निभाव लागणार आहे.

स्वाभिमानीची पायवाट मळण्यापूर्वी मिणचेकरांनी साथ सोडली.

असे असताना मिणचेकर यांच्या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेशामुळे शिवसेनेला किती फायदा होणार? तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ध्येयधोरणे त्यांना समजण्यापूर्वीच त्यांनी स्वाभिमानीला ठोकलेला रामराम हा स्वाभिमानीचा किती तोटा करणार हे आता पहावे लागणार आहे. स्वाभिमानीची पायवाट मळण्यापूर्वी मिणचेकरांनी साथ सोडली. यामुळे संघटनेवर यत्किंचितही परिणाम झाल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांना वाटत नाही.

आ. मानेंना सावध पवित्रा घ्यावा लागणार…!

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या तिकिटावर आमदार झालेल्या दलितमित्र अशोकराव माने यांना खासदार धैर्यशील माने यांची साथ लाभली. यामुळे त्यांचा विजय सुखकर झाला. पण आता खासदार माने यांनी मिणचेकर यांना शिवसेना गोटात आणल्यामुळे दलितमित्र आम. अशोकराव माने यांना सावध पावले टाकावी लागणार आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज