rajkiyalive

suresh khade miraj news : मी मिनी पाकिस्तानात लढतोय: आ. सुरेश खाडे

suresh khade miraj news : मी मिनी पाकिस्तानात लढतोय: आ. सुरेश खाडे मराठी माणूस राहिला की नाही, अशी भिती निर्माण झाली. पक्षाला लोकसभेला अपयश आले पण विधानसभेला सर्व हिंदू एकत्र आले आणि हिंदूत्ववादी सरकार स्थापन झाले. दलित असलो तरी मी हिंदू आहे. गेल्या चार विधानसभा लढवल्या आणि जिंकल्या. मी मिनी पाकिस्तानमधूनच लढतोय. ज्यांनी साथ दिली नाही त्यांचा कार्यक्रम करणार आहे. जिथे रुजवायचे तिथे हिंदुत्वाचे बी रुजवणार आणि जिथे ठोकायचे तिथे ठोकणार, असा इशाराच माजी मंत्री, आ. सुरेश खाडे यांनी दिला.

suresh khade miraj news : मी मिनी पाकिस्तानात लढतोय: आ. सुरेश खाडे

सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्यातील मिरज मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. या मतदार संघातून सलग चार वेळा त्यांनी विजय नोंदवला आहे. मात्र या मतदार संघा बाबतच त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या सभेत बोलताना ते म्हणाले. की  आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढत आहोत. याच मिनी पाकिस्तानातून आपण सलग चार वेळा निवडून आलो आहे. मिनी पाकिस्तान असतानाही आपण विजयाचा चौकार लगावला असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की  विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. विधानसभेत आमची मोठी संख्या आहे. विरोधक आता गल्ली  इतके राहिले आहेत. शिवाय आपला देश हिंदू राष्ट्र झाले पाहिजे. त्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने  पावलं टाकली पाहीजेत. असं म्हणत यांनी पुन्हा एकदा आपल्या मतदार संघाचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला. सुरेश खाडे हे माजी मंत्री आहेत. शिवाय ते भाजपचे जेष्ठ नेते ही आहेत. त्यांच्या या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हिंदुंना सुरक्षित व आर्थिक सक्षम करणार: ना. नितेश राणे

सेक्युलर हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात नाही. ही घाण काँग्रेसने केली आहे. सर्व-धर्म समभावचे रेकॉर्ड कायम वाजविले जाते. त्यांनी हे रेकॉर्ड आता पाकिस्तानात जाऊन वाजवावे. राज्यात हिंदूत्ववादी सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे हिंदुंना सुरक्षित आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम सरकार करणार असल्याचे राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

हिंदू एकता आंदोलन व हिंदू व्यापार्‍यांच्यावतीने येथील मराठा सांस्कृतिक सभागृहात हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ना. नितेश राणे बोलत होते. सभेला माजी मंत्री आ. सुरेश खाडे, आ. सत्यजीत देशमुख, हिंदू एकता आंदोलनाचे माजी आ. नितीन शिंदे, दिनकर पाटील, शेखर इनामदार, नीता केळकर, स्वाती शिंदे, नंदकुमार बापट आदी उपस्थित होते.

ना. नितेश राणे म्हणाले, हिंदुत्वाच्या दिशेनेच देशाची वाटचाल सुरु आहे.

ज्या देशात 90 टक्के हिंदू राहतात ते हिंदू राष्ट्रच आहे. त्याला कोणाच्या परवानगीची गरज नाही. या राष्ट्रात सर्वप्रथम हिंदूचेच हित पाहिले जाणार आहे. आपण धर्माला प्राधान्य दिले पाहिजे. सर्वधर्मसमभावाचा जप सध्या अनेकजण करीत आहेत. त्यांनी ही रेकॉर्ड पाकिस्तानात जावून वाजवावी. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्यात सेक्युलर हा शब्द नव्हता. कॉँग्रेसने तो शब्द

संविधानात घातला. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू बहिणींना लक्ष्य केले जात आहे.

पूर्वनियोजित प्लॅन करून हा उद्योग सुरु आहे. आपण ज्यांच्याकडून खरेदी करतो त्यांच्यामाध्यमातून आपला पैसा जिहादसाठी तर वापरला जात नाही ना? याचा विचार प्रत्येकाने करावा. हिंदू व्यावसायिकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हिंदुंनी हिंदू व्यावसायिकांकडूनच खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मी मतांकरिता त्यांच्या मोहल्ल्यात कधी गेलोच नाही.

ते पुढे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत 58 हजार मतांनी निवडून आलो आहे. मी मतांकरिता त्यांच्या मोहल्ल्यात कधी गेलोच नाही. मुंबईतून मला पाडण्याची फिल्डिंग लावली होती. पण मी हिंदू मतांवरच आमदार झालो आहे, हे जाहीरपणे सांगतो. विधानसभेत प्रचंड बहुमत आल्याने विरोधक ‘ईव्हीएम’च्या नावाने गळे काढत आहेत. कारण त्यांना हिंदू एकत्र येवू शकतो हे बघवत नाही. ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट अगेन्ट मुल्ला’ हा खरे तर त्याचा लॉँगफॉर्म आहे तो हिंदूनी लक्षात ठेवावा.

हिंदुंच्या बाबतीत कधीही तडजोड करणार नाही.

त्यांच्यासाठीच काम करत राहणार आहे. अनधिकृत कोणतेही प्रार्थनास्थळ असो ते पाडलेच पाहिजे. विशाळगडावर रविवारी उरुस भरविण्याचे आयोजन केल्याचे ऐकत आहे. पण सरकार आमचे आहे, मी देखील बघतो उरुस कसा होतो, असे आव्हान देखील ना. नितेश राणे यांनी दिले.

माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, जिल्ह्यात शंभर रूपयांच्या स्टँपवर धर्मांतर केले जात आहे.

लव्ह जिहादचे प्रमाण वाढले आहे. अनेक गावे मुस्लिम व ख्रिश्चन होत आहेत. बांगलादेशी मुस्लिमांनी जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. या प्रश्नावर आम्ही आवाज उठविणार आहोत. प्रतापगडावरील अनधिकृत बांधकामे ज्या प्रकारे हटवली, तोच लढा आता विशालगडासाठी उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नंदकुमार बापट यांनी जिल्ह्यात हिंदू व्यापार्‍यांचा व्यवसाय गु्रप केला आहे. सर्व हिंदू व्यवसायिकांना यापुढे एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते ना. नितेश राणे यांचा चांदीची गदा व भगवी शाल देऊन सत्कार करण्यात आला. अ‍ॅड. स्वाती शिंदे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. यावेळी श्रीरंग केळकर, माजी महापौर संगीता खोत, मनोहर सारडा, गीतांजली ढोपे-पाटील, महेंद्र चंडाळे, सुनील घनवट आदी उपस्थित होते.

खासदारांचा अभ्यास कमी; भाजपचे पुरून उरतील: ना. राणे

सांगलीतील मच्छी मार्केटच्या शुभारंभावेळी खा. विशाल पाटील यांनी सांगली सर्वधर्म समभाव असल्याचे सांगितले. ते माझे भाषण सुरू होण्यापूर्वीच निघून गेले. थांबले असते तर त्यांच्या ज्ञानात भर पडली असती. हिंदू-मुस्लिम एक आहेत तर मग कत्तलखाने का सुरू आहेत? याचे उत्तर त्यांनी देणे आवश्यक आहे. त्यांचा अभ्यास कमी आहेे. पहिल्यांदा खासदार झाला आहात, सांगलीची चुकीची प्रतिमा निर्माण करू नका. विधानसभेला चार भाजपचे आमदार आहेत. तुम्हाला ते पुरून उरतील, असा इशारा ना. नितेश राणे यांनी दिला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज