rajkiyalive

SURESH KHADE NEWS : पालकमंत्री सुरेशभाऊंच्या विरोधात कोण?

SURESH KHADE NEWS : पालकमंत्री सुरेशभाऊंच्या विरोधात कोण?

उदय रावळ
SURESH KHADE NEWS : पालकमंत्री सुरेशभाऊंच्या विरोधात कोण? : मिरज विधानसभा मतदार संघात कामगारमंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी विकासाचा डोंगर उभा केल्याने त्यांचा किल्ला अभेद्यच असणार आहे. त्यांच्या विरोधात यंदा कोण अशीच चर्चा सध्या सुरू आहे.

SURESH KHADE NEWS : पालकमंत्री सुरेशभाऊंच्या विरोधात कोण?

लोकसभा निवडणुकीत जरी मिरज विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवाराला आघाडी मिळाली असली तरीही विधानसभा निवडणुकीत मात्र ना.सुरेशभाऊ खाडे यांचा किल्ला अभेद्यच राहणार आहे. मिरजपूर्व भागात ना.सुरेशभाऊंनी प्रत्येक ग्रामपंचायतीला कोट्यवधींचा निधी दिला आहे. त्यामुळे अजूनही पूर्वभागात भाऊंचे वर्चस्व सिध्द होत आहे. विरोधकांकडून अजूनही उमेदवार फिक्स होत नाही. तसेच विधानपरिषदेमध्ये भाजपचे पाच उमेदवार विजयी झाल्याने आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.

विरोधकांनी लोकसभेत घवघवीत यश मिळाले असले तरी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यावर मतदार नाराज होते. कार्यकर्त्यांचा फोन न उचलणे, कोणत्याही कार्यक्रमाला न जाणे, कार्यकर्त्यांमद्ये संभ्रमावस्ता निर्माण करणे या प्रकारामुळे ते स्वत: पराभूतास कारणीभूत ठरले. अन्यता लोकसभेत अपक्षाला विजय मिळविणे कठीण बनले असते.
लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांना यश मिळाले असले तरी ना.सुरेशभाऊ खाडे हे मिरज तालुक्यात आजही सर्वसामान्यांच्या जवळचे आहेत.

विरोधकांनी आतापासूनच रान उठवायला सुरूवात केली आहे.

अनेकजण लोकसभेसाठी गुडघ्याला बांशिंग बाधून उभे आहेत. तसेच पालकमंत्री ना.सुरेशभाऊ खाडे यांच्यावर टीका करण्याचा सपाटा लावला आहे. परंतु धिरोदत्तपणे उभे असलेले पालकमंत्री यांनी विकासाच्या माध्यमातून चोख उत्तर देत आहेत. मिरज तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला भरघोस निधी दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कार्यकर्तेच भाऊ तुमच्यावेळी तुमच्या सोबत आता थांबा स्पष्टपणे सांगितले होते.

लोकसभेची निवडणूक संपली आता सर्व कार्यर्कर्ते एकजूट होवून कामाला लागल्याचे चित्र आहे.

ना.सुरेशभाऊंनी विकासाचे राजकारण करून अनेकांची तोंड बंद केली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला कोट्यवधींचा निधी आणि विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. रस्तेही पूर्ण झाली आहेत. अनेक हवसे, गवसे, नवसे हे ना.सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु जसेजसे राजकीय आखाड्यात उतरण्याची वेळ येते त्यावेळी सर्वांना अनामत जप्त होेते की काय असा प्रश्न उपस्थित होते.

मिरज मतदार संघात ना.सुरेशभाऊ खाडे यांनी अनेकांची अनामत जप्त केली आहे. राज्यात जरी महायुतीच्या विरोधात वातावरण असले तरी मिरज मतदार संघ हा त्यास अपवाद आहे. कारण भाऊंच्या विकासाच्या ओझ्याखाली सर्व विरोधक गारद होतात. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी पालकमंत्री ना.सुरेशभाऊ खाडे हे सांत्वनासाठी कुठे गेले नाही असा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु आता पालकमंत्री स्वत:हून मिरजजपूर्व भागात अनेकांना भेटत आहेत.

महाविकास आघाडीचा अजून उमेदवार ठरलेला नाही. त्यांच्यातच अजून अंतर्गत लाथाड्या सुरू आहेत.

त्यांच्यामध्येच एकी पेक्षा बेकी जास्त दिसून येत आहे. हा मतदार संघ कोणाला सुटणार यावरून राजकीय रणकंदन सुरूच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे भविष्य काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जशी एकजुट दिसली तशी आता राहणार की नाही हाही मोठा प्रश्न आहे. कारण विरोधकांनाही आपलेसे करण्याची हातोटी ना.सुरेशभाऊंकडे आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याच्यावर अनेक राजकीय गणित अवलंबून आहे.

मिरजपूर्व भाग हा ना.सुरेशभाऊंचे चिरंजीव सुशांत खाडे पिंजून काढत आहेत.

कुठेही गाफील न राहता त्यांनी अनेक गावात कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी संपर्क ठेवला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला कोट्यवधींचा निधी ना.सुरेशभाऊ खाडेंनी दिला आहे. एवढा निधी अजूनही कोणी दिलेला नाही. मिरजपूर्व भागात अजूनही भाऊंचे वर्चस्व दिसून येत आहे. विरोधक कितीही भाऊंच्या विरोधात राजकीय कटकारस्थाने करीत असले तरीही ना.सुरेशभाऊ खाडे धिरोदत्तपणे उभे आहेत. कोणावरही टीका न करता विरोधकांना गारद करत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज