rajkiyalive

खाडेंच्या हॅट्ट्रीकला घटत्या मतांची काळी किनार

पक्ष श्रेष्ठींच्या तरुणाईला प्राधान्य देण्याच्या भूमिकेने प्रस्थापित अडचणीत

 

अनिल काळे, जनप्रवास

मंत्री सुरेश खाडे यांचा 2009, 2014, 2019 या तिन्ही विधानसभा निवडणुकांचा विचार केला असता मताधिक्य घटत आल्याचे दिसत आहे. खाडे यांच्या विजयाच्या हॅट्ट्रीकला प्रत्येक निवडणुकीत घटणार्‍या मताधिक्यांची काळी किनार आहे. भाजपांतर्गत असंतोष आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेले अपयश यामुळेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्व परिक्षा आहे.

लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर आलेली असताना मिरज विधानसभा मतदारसंघात मात्र विधानसभेची चाचपणी सर्वच राजकीय पक्षांमधून केली जात आहे. नव्या रक्ताला वाव देऊन ‘उर्जायुक्त’ भाजप बनविण्याची रणनिती दिल्ली श्वरांनी आखली असल्याने यावेळी मिरज विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री सुरेश खाडे की अन्य असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजप पक्ष विचारधारेनुसार मला नाही तर मुलाला ही नीती भाजप नेते मान्य करतील का? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

 

केंद्र सरकारने लोकसभेबरोबरच महाराष्ट्रात विधानसभांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला तर सावधगिरी म्हणूनच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. 21 ऑक्टोबर 2019 ला झालेल्या मिरज विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुरेश खाडे यांनी विजयाची हॅटट्रीक साधली, पण या निवडणुकीत बाळासाहेब होनमोरे यांनीही बाळासाहेब होनमोरे यांच्यापेक्षा केवळ 30398 चे मताधिक्य सुरेश खाडे यांनी घेतले. 2009,1014, 2019 या निवडणुकांचा विचार केला असता घसरत चाललेले मताधिक्य ही सुरेश खाडे यांच्या विजयाला लागलेली काळी किनार आहे.

2014 मध्ये अल्पकाळासाठी सुरेश खाडे यांना मंत्रिपद मिळाले, तर महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. सत्तेचा वापर त्यांनी विकासासाठी किती केला? याचे उत्तर आगामी विधानसभा निवडणुकीतच मिळणार आहे.
विजयाचा घसरता आलेख :

 

2009 आणि 2014 च्या निवडणुकीत 62 टक्क्यांहून अधिक मतदान झालेल्या मिरज विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत मात्र 53.57 टक्के मतदान झाले. या तिन्ही निवडणुकीत सुरेश खाडे यांना पडलेली मते 93 ते 96 हजारांपर्यंत स्थिर आहेत. तथापि 2019 च्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य 30398 इतके कमी का झाले ? 2009 च्या निवडणुकीत सुरेश खाडे यांनी 54 हजार 456 चे मताधिक्य घेतले होते, तर 2014 च्या निवडणुकीत मताधिक्य वाढून 64067 इतके झाले मात्र 2019 विचार करता हे मताधिक्य केवळ 30398 वर घसरले. महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी सिध्देश्वर जाधव, सी. आर. सांगलीकर इच्छूक आहेत.

हेही वाचा
भाजपमध्ये बेकी, पालकमंत्री, खासदार एकाकी
भाजपमध्ये पॅचअप की उमेदवार बदल?
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये
हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी
फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही
सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’

सुरेश खाडेंचे मताधिक्य घटले याचे उत्तर 2014 च्या निवडणुकीत आहे. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे सिध्देश्वर जाधव यांनी 29728 मते ( 16.02 टक्के), अपक्ष सी. आर. सांगलीकर यांनी 21598 मते ( 11.64 टक्के), शिवसेनेचे तानाजी सातपुते यांनी 20160 मते ( 10.86 टक्के), मते घेतली होती. आता महाविकास आघाडीत असलेल्या आणि त्यावेळी वेगवेगळे लढलेल्या उमेदवारांच्या मतांची बेरीजच 82485 होते, पण 2019 च्या निवडणुकीत मात्र होनमोरे वगळता अन्य कुणीच रिंगणात नव्हते, पण ही सर्व मते एकगठ्ठा पडली नाहीत. 2019 साली मतदानात जी साडेआठ टक्क्यांची घट झाली ती याच मतांची, त्यामुळेच होनमोरे यांना कमी मते मिळाली.

 

1999 व 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे हाफिजभाई धत्तुरे यांनी विधिमंडळात प्रतिनिधीत्व केलेले आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचीही ताकद आहे. उमेदवार कुणीही असो, शिवसेना म्हणून मतदान करणारे कट्टर कार्यकर्ते या मतदारसंघात आहेत. जवळपास 20,000 शिवसेनेची हक्काची मते या मतदारसंघात आहेत. उध्दव ठाकरे गटाकडे उमेदवार नसला तरी काँग्रेस मात्र बदलत्या राजकीय वातावरणात महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिरज विधानसभेच्या जागेची मागणी करू शकते, स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टींचे महाविकास आघाडीशी सूत जुळलेच तर ते देखील मागील विधानसभा आमच्यासाठी सोडा असा दावा करू शकतात.

विरोधकांमधील विभाजनाचा जो फायदा आतापर्यंत भाजपला होत होता, तो मात्र येत्या निवडणुकीत होणार नाही, राष्ट्रवादी (शरद पवार गट) , उबाठा, काँग्रेसची महाविकास आघाडी आगामी निवडणुकीत संघटीतपणे रिंगणात उतरेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज