tasgaon crime news : आरोपीला ’वॉरंट’ बजावणीतील दिरंगाई भोवली, तासगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित: वायफळे खून प्रकरणातील आरोपी विशाल फाळके यास वॉरंट बजावणी दिरंगाई केल्यानेच सदरची घटना घडली असून याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप घुगे यांनी ही कारवाई केली असून निलंबन केलेल्यांमध्ये वेदकुमार धोंड व पवन जाधव यांचा समावेश आहे.
tasgaon crime news : आरोपीला ’वॉरंट’ बजावणीतील दिरंगाई भोवली, तासगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
वायफळे खून प्रकरणातील आरोपी विशाल सज्जन फाळके यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तासगाव यांनी वॉरंट काढण्यात आले होते. मात्र आरोपी विशाल सज्जन फाळके याची वॉरंट बजावणी न केल्यामुळे आरोपी विशाल सज्जन फाळके हा न्यायालयात हजर न राहिल्यामुळे आरोपी विशाल फाळके व मयत ओकार उर्फ रोहित संजय फाळके यांचेतील वाद विकोपास जावून विशाल फाळके यांने मयताच्या कुंटुबातील व्यक्तीतने केलेल्या केसेस व मा. न्यायालयात सुरू असलेल्या केसेस मागे घेत नाही याचा राग मनात धरून दि 12.12.2024 रोजी सायंकाळी 6.00 वा विशाल फाळके व त्याचे अनोळखी पाच त सहा साथीदार यांनी वायफळे येथे हल्ला केला.
या ठिकाणी ओकार उर्फ रोहित फाळके, संजय दामु फाळके, जयश्री संजय फाळके, आशिष साठे व आदित्य साठे, सिकंदर शिकलगार यांना तलवारी, कोयत्यांनी मारहाण केली असून, झाले मारहाणीत रोहीत फाळके हा मयत झाला असून, उर्वरीत सर्वजण जखमी असून त्यांचेवर हॉस्पीटल मध्ये उपचार सूरू आहेत.
तुम्ही आरोपी विशाल फाळके यास मा. न्यायालयातुन वेळोवेळी प्राप्त झालेले वॉरंट बजावणी केली असती तर न्यायालयात सदरचा आरोपी हजर राहून त्याबाबतची केसची सुनावणी झाली असती तर दि.12.12.2024 रोजीची गंभीर घटना घडली नसती. तुम्ही वॉरंट बजावणीचे कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याचे दिसून आले आहे. असे सांगत वेदकुमार धोंड व पवन जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



