rajkiyalive

TASGAON : दुष्काळातील लाखोच्या निधीवर जिल्हा बँकेच्या लिपिकाचा डल्ला

तासगाव मार्केट यार्ड शाखेतील प्रकार

जनप्रवास । प्रतिनिधी
TASGAON : दुष्काळातील लाखोच्या निधीवर जिल्हा बँकेच्या लिपिकाचा डल्ला : सांगली ः शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपोटी येणार्‍या दुष्काळ निधी खात्यात जिल्हा बॅँकेच्या तासगाव येथील मार्केट यार्ड शाखेत अफरातफर झाली आहे. येथील बॅँकेचे लिपीक योगेश वजरीनकर यांनी या खात्यातील शासनाचे लाखो रुपये परस्पर बनावट चलनाव्दारे स्वत:च्या बॅक खात्यात वर्ग केले आहे. या घोटाळ्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

TASGAON : दुष्काळातील लाखोच्या निधीवर जिल्हा बँकेच्या लिपिकाचा डल्ला

दुष्काळ, अतिवृष्टी झाल्यावर शासनाकडून नूकसान ग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिली जाते तसेच पीक विम्याची रक्कम मिळते. या शासकीय मदतीच्या रक्कमा संबधित लाभार्थी शेतकर्‍यांच्या बॅँक खात्यावर जिल्हा बॅँकेच्यावतीने वर्ग करण्यात येतात. पण ज्या खातेदाचा शोध लागत नाही, ज्यांची खाती जिल्हा बॅँकेत नाहीत, अशा लाभार्थी शेतकर्‍यांच्या मदतीच्या रक्कमा जिल्हा बॅँके वर्षानुवर्ष पडून राहतात. या रक्कमा दुष्काळ निधी या नावाच्या स्वतंत्र खात्यात ठेवल्या जातात. तासगाव येथील मार्केट यार्ड शाखेतील लिपीक योगेश वजरीनकरण यांनी संधी साधत या दुष्काळ निधी खात्यावरच डल्ला मारल्याचे उघड झाले आहे.

वजरीनकर यांनी 2 मे 2024 रोजी या खात्यातील दहा लाख रूपये स्वत:च्या एका राष्ट्रीयीकृत बॅँकेच्या खात्यात वर्ग केले.

मात्र याचे चलन करण्यात तो विसरला. या तारखेची अन्य चलने लावत असताना पुढे चार ते पाच दिवसांनी बॅँकेतील अन्य कर्मचार्‍यास दहा लाखांचे चलन नसल्याचे आढळले. याबाबत त्यांनी सांगलीतील प्रधान कार्यालयात कळवले. यानंतर वरिष्ट अधिकार्‍यांनी चौकशी केली असता वजरीनकर यांनी परस्पर दुष्काळ निधीतील दहा लाख रुपये त्यांच्या अन्य बॅँकेतील खात्या वर्ग केल्याचे आढळले. चौकशी केला असा हा प्रकार मागील काही वर्षापासून सुरु असून सुमारे 50 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली असल्याचे प्राथमिक तपासात आढळले.

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबधित कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.

चलन विसरला आणि सापडला

जिल्हा बॅँकेतील तासगाव शाखेतील योगेश वजरीनकर हे बॅँकेच्या तालुका अधिकार्‍यांना सहाय्यक अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे त्यांना बॅँकेतील चलने पासींग करण्याचाही अधिकार आहे. वजरीनकर यांनी दुष्काळ निधीत वर्षानुवर्ष पडून असलेल्या लाखो रुपयांवर डल्ला मारताना स्वत: बनावट चलने तयार करुन स्वत:च पास करायचे. त्यामुळे हा प्रकार शाखाधिकार्‍यांसह अन्य अधिकार्‍यांच्या लक्षात आला नाही. 2 मे 2024 रोजी त्यांनी दहा लाख रुपये या निधीतून स्वत:च्या खात्यावर वर्ग केले. पण याचे चलन करण्यासच विसरल्याने घोटाळा बाहेर आला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज