rajkiyalive

tasgaon kavtemankhal news : अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा संजयकाका पाटील यांना जाहीर पाठिंबा*

tasgaon kavtemankhal news : अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा संजयकाका पाटील यांना जाहीर पाठिंबा* : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संजयकाका पाटील यांना सर्व सामाजिक स्तरावरून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आज अखिल भारतीय होलार समाज संघटनेने राष्ट्रीय अध्यक्ष मा. शहाजी पारसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली जिल्हा अध्यक्ष मा. शिवाजी भाऊ गुळवे यांच्या प्रमूख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संजयकाका पाटील यांना समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करुन तासगाव – कवठेमहांकाळ मधील आमचा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे नमूद केले. 

tasgaon kavtemankhal news : अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा संजयकाका पाटील यांना जाहीर पाठिंबा*

यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ गुळवे म्हणाले, तासगाव – कवठेमहांकाळ तालुक्यातील होलार समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संजयकाकांनी आम्हाला नेहमीच साथ दिलेली आहे. दोन्ही तालुक्यातील विकासकामे करण्यासोबतच समाजाच्या प्रगतीसाठी काका नेहमीच अग्रेसर असून आमचा समाजही त्यांच्या सोबत असणार आहे.
प्रकाश कांबळे सर म्हणाले, संजयकाकांसारखे नेतृत्व आपल्या विधानसभा क्षेत्राला मिळाले तर तासगाव व कवठेमहांलाळ तालुक्यात  सांगली जिल्ह्यात झालेला चौफेर विकासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या ३५ वर्षाचा विकासाचा बॅकलॉक भरुन काढण्यासाठी व आपला मतदारसंघ प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी आम्ही पाठिंबा जाहीर करुन काकांचे हात बळकट करीत आहोत.
यावेळी राहूल हत्तीकर, तानाजी गुळवे, अभिजीत गुळवे, गणेश हत्तीकर शिवाजी आबा गुळवे, अर्जून गुळवे, रमेश गेजगे, अंकूश केंगार, विनायक कांबळे, उमेश हत्तीकर, चंद्रकांत ऐवळे, परशुराम हत्तीकर, संतोष गुळीक, दादा गुळीक, अनिलेत गुळीक, शामराव अवळे, निखील अवळे, दादा अवळे, विनोद कांबळे, मिलिंद होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज