rajkiyalive

tasgaon -kavtemankhal news : आबा-काका लढतीत थोडक्या मताचेच अंतर

tasgaon -kavtemankhal news : आबा-काका लढतीत थोडक्या मताचेच अंतर : सांगली जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा राज्यात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या तासगाव कवठेमहांकाळमध्ये यंदा काट्याची लढत होत आहे. दोन टर्म खासदार राहिलेले काका 2004 नंतर म्हणजे 20 वर्षानंतर पहिल्यांदाच आमदारकीच्या रिंगणात उतरले आहेत. तासगाव मतदार संघ असताना दोन वेळा काठावरच काकांचा पराभव झाला. आता मात्र कवठेमहांका तालुका असल्याने काकांनी जोर लावल्याचे दिसत आहे.

tasgaon -kavtemankhal news : आबा-काका लढतीत थोडक्या मताचेच अंतर

आबा आणि काका यांच्यातील लढाई उभ्या राज्याने पाहिले. दोघांमध्ये पहिला सामना झाला तो 1999 मध्ये. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. त्यावेळी आर. आर. पाटील राष्ट्रवादीत गेले. संजयकाका मात्र काँग्रेसमध्ये राहणे पसंत केले. दोन्ही काँग्रेसमध्ये निवडणुका लागल्या. आर. आर . पाटील यांना 55166 मते मिळाली तर संजयकाका यांना 51669 मते मिळाली. अगदी थोडक्या मतांनी म्हणजे 3497 आबा विजयी झाले.

2004 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा आबा आणि काका यांच्यात लढत झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या आर. आर.पाटील आबा यांना 70483 मते मिळाली तर काँग्रेसच्या संजयकाका यांना 64179 मते मिळाली. काकांचा केवळ 6304 मतांनी पराभव झाला. त्यानंतर राजकारणात उलथापालथ झाली. संजयकाकांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. त्यामुळे संजयकाका विधानसभेला उतरले नाहीत.

2009 मध्ये मतदार संघांची पुनर्रंचना झाली. कवठेमहांका मतदार संघ रद्द होवून नवीन तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघ निर्माण झाला. मतदार संघ पुनर्रचनेनंतर पहिल्यांदाच काका विधानसभेच्या आखाड्यात पहिल्यांदाच उभे आहेत. काका आणि आबांच्या लढाईत अगदी थोडक्या मताचे अंतर राहिले आहेत. आपल्या राजकारणाच्या अनुभवावर आता संजयकाका विधानसभा मारण्याच्या तयारीत आहेत. विधानपरिषदेचे आमदार आणि दोन वेळा खासदार राहिलेले संजयकाका यांना तासगाव विधानसभा मतदार संघ आवाक्यातील आहे. अगदी होम टू होम कार्यकर्त्यांचे जाळे असणार्‍या काकांनी मतदार संघ पिंजून काढत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज