कवठेमहांकाळ :
tasgaon vidhansabha election news : घोरपडे सरकार व संजय काका एकत्र येण्याचे संकेत : आगामी विधानसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा दिला आहे. आगामी काळात तुमच्या माणसाला विधानसभेत जाण्याची संधी मिळणार आहे. विकास आघाडीचे सर्वेसर्वा अजितराव घोरपडे यांनी सुतोवाच केले आहे. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार व माजी खासदार संजयकाका पाटील यांचे एकत्र येण्याचे संकेत राजकीय हालचालींवरून दिसून येत आहे.
tasgaon vidhansabha election news : घोरपडे सरकार व संजय काका एकत्र येण्याचे संकेत
संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर परिचित असलेला आर. आर. आबा पाटील व संजयकाका पाटील या पारंपरिक राजकीय विरोधक घराण्यातील संघर्ष पुन्हा निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी युवानेते रोहित पाटील यांना यापूर्वीच जाहीर झाली आहे. तर तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे.त्यामुळेच भाजपाचे युवा नेते प्रभाकर पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधावे लागणार आहे.
महायुतीतील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ पातळीवरील नेते मंडळीच्या राजकीय व्यूह रचनेमुळे तडजोड केली जात आहे.
तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हा सामना होणार आहे. पक्ष कोणतेही असले तरी लढत मात्र पारंपरिक विरोधकात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची अजितराव घोरपडे सरकार व संजय काका पाटील यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे.अजित पवार यांच्या सूचनेनुसार सरकार व संजय काका यांच्या राजकीय हालचाली सुरू आहेत.
माजी राज्य मंत्री अजितराव घोरपडे यांच्या निर्णायक भुमिके कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत आपल्या संघटनेच्या माध्यमातून तुमचे अस्तित्व नक्की राहील.या पुढील काळात तुमच्यावर व जनतेवर अन्याय होणार नाही. आगामी काळात सत्तेचा लाभ शेतकरी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना होणार आहे. असे म्हणत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी राजवर्धन घोरपडे यांना आमदार होण्याची संधी मिळेल,असे कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे सूचित केले, व व त्यासाठी आपल्याला एखादी कडू गोळी खायची वेळ आली तर ती खावी लागेल,असे म्हणत संजय पाटील यांना अथवा त्यांच्या मुलाला मदत करावी लागेल. असेही माजी मंत्री घोरपडे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणती रणनीती आखावी. यासाठी अजितराव घोरपडे यांनी कार्यकर्त्यांची दूध संघ कार्यालयात बैठक बोलावली होती यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अजितराव घोरपडे यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली यावेळी बर्याच कार्यकर्त्यांनी अजितराव घोरपडे यांनी निवडणूक लढवावी अशी ही मागणी केली. मात्र घोरपडे यांनी या वेळेला मी निवडणूक लढवणार नाही. राजकारणातील फसव्या व गदार लोकांच्या वर माझा विश्वास राहिला नाही. त्यामुळे मी निवडणुकीच्या राजकारणा पासून लांब राहायचे ठरवले आहे. मात्र तुमचा माणूस आमदार झालेला नक्की दिसेल याची खात्री बाळगा, असे कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
घोरपडे पुढे म्हणाले की , कवठेमहांकाळ तालुक्याच्या विकासासाठी आपण कोणता निर्णय घ्यावा यासाठी राज्यपातळीवरील बर्याच नेत्यांचे फोन आले आहेत. बर्याच नेत्यांनी आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणा. अथवा आपण उमेदवारी घ्या असे सांगितले आहे. मात्र महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या वाट्याला गेली आहे त्यांनीही ही जागा तुम्ही लढवा अथवा आमच्या उमेदवाराला निवडून आणा तुमच्या तालुक्याची जबाबदारी मी घेतो असे सांगितले आहे. मात्र अजून कोणताही निर्णय झाला नाही . तुम्हा सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय सांगतो असे त्यांना कळविले आहे. कार्यकर्त्यांच्या वर अन्याय होणार नाही व तुमच्या सर्वांचा माणूस विधानसभेत दिसेल असा निर्णय घेतला जाईल.असे ते सांगत अप्रत्यक्षपणे अजितराव घोरपडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर जात संजय काकांना मदत करणार असल्याचे घोरपडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी युवा नेते राजवर्धन घोरपडे म्हणाले की, आपल्या शेतकरी विकास आघाडीचे भविष्य अंधारात राहणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. संघटना मजबूत ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. राज्यपातळीवरील काही नेते सरकारांना शब्द देतील त्यामुळे आपली संघटना मजबूत होईल. तसेच सरकारांनाही राज्य पातळीवरील नेत्यांना काही शब्द द्यावे लागतील ते शब्द पाळायची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असे राजवर्धन घोरपडे म्हणाले.
एकंदरीत विचार करता लोकसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे व माजी खासदार संजय काका पाटील यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र यावेळी अजित पवार यांच्या भुमिकेमुळे घोरपडे सरकार व संजय काका यांचे एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.