rajkiyalive

tasgaon vidhansabha election : संजय काका विधानसभेच्या मैदानात उतरणार..?

राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवारांनी अट घातल्याची चर्चा, लवकरच होणार चित्र स्पष्ट

जनप्रवास: विनायक कदम

tasgaon vidhansabha election : संजय काका विधानसभेच्या मैदानात उतरणार..? : तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघासाठी संजय काका तुम्हीच उमेदवार पाहिजे अशी अट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी घातली असल्याची चर्चा सांगली जिल्ह्यात आहे. रोहित पाटलांविरोधात प्रभाकर पाटील यांनी दंड थोपटले असले तरी ऐनवेळी मैदानात माजी खासदार संजयकाका पाटील यांना उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते.

tasgaon vidhansabha election : संजय काका विधानसभेच्या मैदानात उतरणार..?

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पेच अद्याप सुटला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विरोधात मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या वेगवान हालचाली सुरू आहेत.
भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याने रोहित पाटील व प्रभाकर पाटील अशी दुरंगी लढतीची शक्यता होती.

मतदार संघात प्रभाकर पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे प्रभाकर पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित आहे. मात्र, महायुतीत हा मतदारसंघ भाजपशिवाय ज्या मित्रपक्षाच्या वाट्याला जाईल.
त्या पक्षात प्रभाकर पाटील यांना प्रवेश करावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे प्रभाकर पाटील लवकरच घड्याळ हातात बांधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माजी खासदार संजयकाका पाटील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाण मांडून आहेत. मात्र अजित पवार यांनी संजयकाका यांनीच उमेदवार म्हणून रिंगणात उतरावे अशी अट घातल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचे पुत्र रोहित पाटील रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, महायुतीच्या फॉर्म्युल्याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेकडून तत्कालीन राज्यमंत्री अजितराव घोरपडे उमेदवार होते मात्र अद्याप त्यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे.

संजयकाका मैदानात उतरल्यास काटा लढत होईल असे राजकीय अभ्यासक सांगतात. मात्र महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार यावर अद्याप सस्पेन्स असून लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज