rajkiyalive

vanchit aaghadi news : सांगली जिल्ह्यात ‘वंचित’चा प्रभाव मावळला: केवळ 0.7 टक्के मतदान

vanchit aaghadi news : सांगली जिल्ह्यात ‘वंचित’चा प्रभाव मावळला: केवळ 0.7 टक्के मतदान : सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव आता मावळला असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. या सर्व उमेदवाराला अवघी 9 हजार 600 मते पडली असून ही मते एकूण मतांच्या केवळ 0.7 टक्केच मते आहेत.

vanchit aaghadi news : सांगली जिल्ह्यात ‘वंचित’चा प्रभाव मावळला: केवळ 0.7 टक्के मतदान

सांगली जिल्ह्यात 2019 ला वंचित बहुजन आघाडीचा मोठा प्रभाव होता. ‘वंचित’चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत आ. गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी बहुजन समाज आ. पडळकर यांच्या पाठीमागे उभा होता. त्यांनी जोरदार निवडणूक लढवली होती. त्यांना या निवडणुकीत 3 लाख 234 मते मिळाली होती. एकूण मतांपैकी सुमारे 25.23 टक्के मते त्यांनी घेतली होती. त्यानंतर जिल्ह्यात वंचितचे वारे वाहू लागले होते. अनेक मुद्द्यावर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारून बहुजन समाजाने साथ दिली होती.

त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभा न करता काँग्रेसचे सहयोगी खा. विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता. खा. पाटील यांच्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत सभा देखील घेतली होती. त्याचा फायदा खा. विशाल पाटील यांना झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत वंचितचा फॅक्टर चालला नसल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील जत व शिराळा विधानसभा मतदारसंघ वगळता इतर मिरज, सांगली, इस्लामपूर, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले होते. या सर्व उमेदवारांना केवळ 9 हजार 600 मते पडली.

यामध्ये मिरजेतून लढलेले विज्ञान माने यांना सर्वाधिक 5 हजार 528, इस्लामपूरमधून राजेश गायगवाळे यांना 994, खानापूर-आटपाडीमधून संग्राम माने यांना 992, तासगाव-कवठेमहांकाळमधून दत्तात्रय आठवले यांना 841, सांगलीतून अल्लाउद्दीन काझी यांना 689 व पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून जीवन करकटे यांना 556 मते पडली. विधानसभा मतदारसंघातील टक्केवारी पाहता 0.7 टक्के मते ही वंचित बहुजन आघाडीला मिळाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज