rajkiyalive

vasantdada karkhakhana election news : वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीत 111 अर्ज वैध तर 33 अर्ज अवैध

vasantdada karkhakhana election news : वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीत 111 अर्ज वैध तर 33 अर्ज अवैधयेथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली. या छाननीमध्ये 33 अर्ज अवैध झाले. तर 111 अर्ज वैध ठरले. आता अर्ज माघारीसाठी 11 ते दि. 25 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खासदार विशाल पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

vasantdada karkhakhana election news : वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीत 111 अर्ज वैध तर 33 अर्ज अवैध

येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. वसंतदादा कारखान्याच्या 21 संचालक पदांसाठी निवडणूक होत आहे. कारखान्याचे 36 हजार मतदार आहेत. यामध्ये सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटांमधून प्रत्येकी 3 असे 15, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदारसंघ 2, महिला- 2, तसेच अनुसूचित जाती किंवा जमाती मागासवर्गीय 1, भटक्या-विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गामधून 1 असे 21 संचालक निवडून द्यायचे आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत 21 जागांसाठी 144 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यामध्ये खासदार विशाल पाटील, हर्षवर्धन प्रतिक पाटील, अमित पाटील, प्रविण पाटील, बजरंग पाटील यांच्यासह आजी-माजी संचालकांचा समावेश आहे. दाखल अर्जांची छाननी सोमवारी झाली. यामध्ये 33 जणांचे अर्ज अवैध ठरले. तर 111 जणांचे अर्ज वैध ठरले. अर्ज माघार घेण्याची मुदत दि. 11 ते दि. 25 फेब्रुवारी आहे.

अंतिम उमेदवारांची यादी दि. 27 फेबु्रवारीला होणार असून आवश्यक वाटल्यास दि. 9 मार्चला मतदान होणार आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खा. विशाल पाटील व कारखान्याचे संचालक अमित पाटील प्रयत्न करत आहेत.

गटनिहाय वैध ठरलेले अर्ज; कंसात अवैध अर्ज:- उत्पादक क्र. 1 सांगली 26 (9), गट क्रमांक दोन मिरज- 12 (6), गट क्रमांक तीन आष्टा- 20 (7), गट क्रमांक चार भिलवडी- 10 (2), गट क्रमांक पाच तासगाव- 19 (4), सहकारी संस्था, पणन संस्था – 3 (1), अनुसूचित जाती, जमाती- 3, महिला सदस्या- 7 (3), मागासवर्गीय जाती- 5 (1), भटक्या जाती, विशेष मागासप्रवर्ग- 7.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज