rajkiyalive

vidhansabha election news : ज्या चिन्हा विरोधात लढले आज त्याच चिन्हावर लढण्याची वेळ

दिनेशकुमार ऐतवडे

vidhansabha election news : ज्या चिन्हा विरोधात लढले आज त्याच चिन्हावर लढण्याची वेळ : राजकारणात कधी काय होईल ते काय सांगता येत नाही. राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमच शत्रू नसतो याची प्रचिती सध्या येत आहे. गेल्या निवडणुकीत ज्या चिन्हाविरोधात लढले आज त्याच चिन्हावर लढण्याची वेळ जिल्ह्यातील दोन उमेदवारांवर आली आहेे. इस्लामपूर मतदार संघात निशिकांत पाटील आणि शिरोळ मतदार संघात उल्हास पाटील या दोघांचा त्यामध्ये समावेश आहे.

vidhansabha election news : ज्या चिन्हा विरोधात लढले आज त्याच चिन्हावर लढण्याची वेळ

2019 च्या विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उभे होते. त्यावेळी त्यांचे चिन्ह घड्याळ होते. तर त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निशिकांत पाटील उभे होते. त्यावेळी जयंत पाटील यांना सुमारे 1 लाख 20 हजार आणि निशिकांत पाटील यांना 43 हजार मते मिळाली होती. त्यानंतर निशिकांत पाटील यांना भाजपचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. पाच वर्षात त्यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात भरपूर तयारी केली.

दीड वर्षापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. अजितदादा गट सरकारमध्ये सामिल झाले. आता महायुतीतर्फे विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात येत आहेत. महायुतीमध्ये इस्लामपूरची जागा अजितदादा गटाला गेली आहे. त्यामुळे निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यामुळे त्यांना घड्याळ हे चिन्ह मिळाले. गेल्या निवडणुकीत ज्या चिन्हाविरोधात निवडणूक लढवली त्याच चिन्हावर लढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

दुसरीकडे असाच प्रसंग कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदार संघात घडला आहे. गेल्या निवडणुकीत शिरोळ विधानसभा मतदार संघात राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष उमेदवार होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे उल्हास पाटील उभे होते. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटेच्या तिकीटावर अनिल उर्फ सावकार मादनाईक उभे होते. तिरंगी लढत होवून येथे अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर हे निवडून आले.
यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे ही जागा काँग्रेसच्या वाटणीला आली.

येथून काँग्रेसच्या गणपतराव पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेचे उल्हास पाटील यांनी पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ज्या स्वाभिमानीच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच स्वाभिमानीच्या तिकीटावर आणि चिन्हावर लढण्याची वेळ उल्हास पाटील यांच्यावर आली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ज्या चिन्हावर आणि ज्या पक्षाविरोधात लढते त्याच पक्षाच्या चिन्हावर लढण्याची वेळ निशिकांत पाटील आणि उल्हास पाटील यांच्यावर आली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज