vidhasagar maharaj news : 72 घोडे, 9 रथ आणि 2 हत्ती समडोळीत रविवार 17 रोजी भव्य अन दिव्य मिरवणूक : विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांचे पदारूढ स्थान असलेल्या मिरज तालुक्यातील समडोळी येथे रविवार 17 नोव्हेेंबर रोजी भव्य आणि दिव्य मिरवणूक निघणार आहे. आचार्य सन्मतीसागर महाराज यांचे परमशिष्य प. पू. धर्मसागरजी महाराज आणि आगम चक्रवर्ती विद्यासागर महाराज यांचा ससंघ चातुर्मास सुरू आहे. या चातुर्मासची सांगता आणि सिध्दचक्र विधानाची सांगता या भव्य आणि दिव्य मिरवणुकीने होणार असल्याची माहिती चातुर्मास कमिटीने दिली.
vidhasagar maharaj news : 72 घोडे, 9 रथ आणि 2 हत्ती समडोळीत रविवार 17 रोजी भव्य अन दिव्य मिरवणूक
गेल्या वर्षभरापासून समडोळी येथे आचार्य शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री 1008 भ. महावीर जिनमंदिरच्यावतीने आचार्य सन्मतीसागर महाराज यांचे परमशिष्य प. पू. धर्मसागरजी महाराज, आगमचक्रवर्ती विद्यासागरजी महाराज, आगमसागरजी महाराज, अजितसागरजी महाराज आणि अनेकांतसागरजी महाराज यांचे पावन वर्षायोग सुरू होते.
या चातुर्मासमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या चार महिन्यापासून समडोळी नगरी धार्मिक नगरी बनली आहे. लाखो श्रावक श्राविकांनी गावास भेट देवून दर्शन घेतले.
सप्टेंबर महिन्यामध्ये आचार्य शांतीसागरज महाराज यांची पुण्यतिथी भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरी करण्यात आली. 9 नोव्हेंबरपासून सिध्दचक्र विधानाचेही आयोजन करण्यात आले होतेे. या विधानाची सांगता रविवारी होत आहे. तसेच रविवार 17 रोजी पिंछी परिवर्तनाचा कार्यक्रमही होणार आहे. यावेळी भव्य आणि दिव्य मिरवणूक निघणार आहे. यावेळी 2 हत्ती, 9 रथ आणि 72 घोड्यांचा मिरवणुकीत समावेश असणार आहे. दुपारी 1 वाजता पिंछी परिवर्तनाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी 5 वाजता मिरवणुकीस सुरूवात होईल.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



