rajkiyalive

VIDHYASAGAR MAHARAJ : समडोळीत 3 ऑगस्ट रोजी चातुर्मास कलश स्थापना

दिनेशकुमार ऐतवडे,
VIDHYASAGAR MAHARAJ : समडोळीत 3 ऑगस्ट रोजी चातुर्मास कलश स्थापना ” विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पदारूढ शताब्दी वर्षानिमित्त मिरज तालुक्यातील समडोळी येथे श्र्री 1008 भ. महावीर दिगंबर जिनमंदिरच्यावतीने भव्य असे चातुर्मास सुरू झाले आहे.

VIDHYASAGAR MAHARAJ : समडोळीत 3 ऑगस्ट रोजी चातुर्मास कलश स्थापना

या चातुर्माससाठी आचार्य सन्मतीसागर महाराज यांचे शिष्य निर्यापक श्र्रवण प. पू. 108 विद्यासागरजी महाराज, निर्यापक श्र्रवण 108 धर्मसागरजी महाराज, प. पू. 108 अजितसागरजी महाराज, प. पू. 108 आगमसागरजी महाराज, प. पू. 108 अनेकांतसागरज महाराज हे समडोळीत दाखल झाले असून, शनिवार 3 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मंगल कलशची स्थापना होणार आहे. रविवार 28 जुलै रोजी कलश स्थापना होणार होती. परंतु पूर परिस्थिती आणि मुसळधार पावसामुळे हा सोहळा 3 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती चातुर्मास कमिटीने दिली.

चातुर्मास मंगल कलश स्थापनेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून, बाहेरगावच्या श्र्रावकांसाठी राहण्याची आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे.

मिरज तालुक्यातील समडोळी येथील श्र्री 1008 भ. महावीर दिगंबर जिन मंदिरच्यावतीने 12 वर्षापूर्वी आचार्य शितलसागरज महाराज यांचा चातुर्मास झाला होता. त्यानंतर यंदा चातुर्मास होत आहे. 20 व्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य शताब्दी समारोहानिमित्त भव्य चातुर्मासचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या कलश स्थापनेसाठी येथील शालिनी ग्राउंडवर भव्य असा शामियाना उभा करण्यात आला आहे. गावात स्वागत कमानी, पंचरंगी झेंडे लावण्यात आले आहेत.

आचार्य शांतीसागरजी महाराज यांना 1924 च्या दसर्‍या दिवशी समडोळीत आचार्य ही पदवी देण्यात आली होती. वीसाव्या शतकातील प्रथमाचार्य अशी त्यांची ओळख आहे. त्या समारंभाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून समडोळी नगरीत भरगच्च कार्यक्रम होत आहेत.

शनिवार 3 ऑगस्ट रोजी चातुर्मास कलश स्थापना होणार आहे. यावेळी 11 कलशांचा सवाल निघणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज