rajkiyalive

vidhyasagar maharaja : विद्यासागर महाराजांनी उलगडला स्वातंत्र्यसंग्रामातील रणसंग्राम

सांगली :

vidhyasagar maharaja : विद्यासागर महाराजांनी उलगडला स्वातंत्र्यसंग्रामातील रणसंग्राम : महान योध्दा महाराणा प्रताप यांच्यापासून 1999 च्या कारगील युध्दापर्यंत भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर परकीयांपासून रक्षण करणार्‍या सैनिकांच्या आठवणींना समडोळीत उजाळा मिळाला. निमित्त होते 15 ऑगस्टनिमित्त आयोजित केलेल्या विशेष प्रवचनाचे….

vidhyasagar maharaja : विद्यासागर महाराजांनी उलगडला स्वातंत्र्यसंग्रामातील रणसंग्राम

मिरज तालुक्यातील समडोळी येथे 1008 भ. महावीर दिगंबर जिनमंदिरच्यावतीने पावन वर्षायोगचे आयोजत करण्यात आले आहे. आचार्य सन्मतीसागर महाराज यांचे परमशिष्य निर्यापक श्र्रमण 108 धर्मसागर महाराज ,निर्यापक श्र्रमण 108 विद्यासागर महाराज, 108 अजितसागर महाराज, 108 आगमसागर महाराज आणि 108 अनेकांतसागर महाराज यांचे चातुर्मास समडोळीनगरीत सुरू आहे. दररोज दुपारी तीन ते पाच यावेळेत भव्य सभामंडपात या प्रवचनचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ऑगस्टनिमित्त विद्यासागर महाराज यांचे विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या अमोघ वाणीतून स्वातंत्र्यसंग्रामातील रणसंग्राम उलगडला.

चितोडगढचे राजे महाराणा प्रताप यांच्यापास्ाून ते छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, 1857 च्या बंडातील मंगल पांडे, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्द शास्त्री, 1965, 1971 च्या युध्दातील थरारक प्रसंगी, कारगील युध्द, मुंबईवरील दहशतवादी हल्ला यातील प्रसंग त्यांनी अक्षरक्षा उभे केले. श्र्रावक श्र्राविकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. सुमारे सव्वा दोन तास चाललेल्या या प्रवचनातून त्यांनी अनेक प्रसंग उभे केले. सैनिकांप्रती असलेली भावना, त्यांचे त्याग, समर्पण, त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या वाट्याला येणारा अवहेलना हे ऐकून अनेकांना गहीवरून आले.

शुक्रवार 16 रोजी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्तही विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यासागर महाराज यांनी वीराचार्यांचा जिवनपट उलगडला. त्यांची समाजसेवा, व्यसनमुक्तीसाठी त्यांनी केलेले आहे. समाजातील तरूणांना धार्मिकतेकडे वळविण्यासाठी घेतलेले कष्ट याची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या प्रवचनातून सांगितलेे.
सध्याचे धर्मसागर महाराज आणि पूर्वाश्रमीचे शांतीनाथअण्णा होेरे यांनीही वीराचार्यासोबत घालविलेल्या क्षणांची आठवण करून दिली. आपल्या विनोदी शैलीतून श्र्रावकांना अगदी मनमुराद हसविले.

यावेळी वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन एन. जे. पाटील, संचालक डि. के. पाटील, चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष बापूसो ढोले व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज