rajkiyalive

vishal patil sangli news : अर्थसंकल्पात सांगली स्मार्टसिटी, विमानतळ, सिंचन योजनांना निधी का नाही?

जनप्रवास । प्रतिनिधी
vishal patil sangli news : अर्थसंकल्पात सांगली स्मार्टसिटी, विमानतळ, सिंचन योजनांना निधी का नाही? : सांगलीचा स्मार्ट सिटीत समावेश का करण्यात आला नाही. कवलापुरच्या विमानतळासाठी आर्थिक तरतूद याबरोबर टेंभू आणि म्हैसाळ विस्तारीत योजनांसाठी ए. आय. बी. पी. योजनेतून निधी का दिला नाही? असा सवाल करत सांगलीचे खा. विशाल पाटील यांनी संसदेत हल्लाबोल केला. अर्थसंकल्पात राज्यावर किती अन्याय झाला, या अन्यायाचा पाढा त्यांनी दिल्लीत मांडला.

vishal patil sangli news : अर्थसंकल्पात सांगली स्मार्टसिटी, विमानतळ, सिंचन योजनांना निधी का नाही?

ते म्हणाले, सांगलीला अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. दीड तासाच्या भाषणात एकदाही महाराष्ट्राचे नाव घेतले गेले नाही. आसाम, बिहारमधील महापुराचा उल्लेख झाला. महाराष्ट्रातील महापूराच्या नुकसानीवर त्या बोलल्या नाहीत. सांगली मतदारसंघाची अपेक्षा आहे स्मार्ट सिटीत येण्याची. इथे विमानतळाला निधी दिला नाही. बिहारमधील सिंचनासाठी तुम्ही निधीची तरतूद केली, मात्र टेंभू, म्हैसाळ योजनेचा उल्लेख करण्याची गरज तुम्हाला वाटली नाही.

कराचा 37 टक्के हिस्सा महाराष्ट्रातून येतो, भारताच्या जीडीपीचा 14 टक्के हिस्सा महाराष्ट्रातून येतो. पाच ट्रीनियन इकॉनॉमीची स्वप्ने पाहताना त्यात एक ट्रिलीयन वाटा महाराष्ट्राचा असला तरच ते शक्य होणार आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी भारताचा विकास अशक्य असल्याचे सांगून त्यांनी महाराष्ट्र गीताच्या ओळी गात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी खासदारांवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, दारिद्र्यांच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा. इतिहास साक्षी आहे, दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र घेत होता, घेत आहे आणि घेत राहील. आर्थिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रात हे महाराष्ट्राने करून दाखवले आहे.

कुबड्या घेऊन चालणारे हे सरकार आहे. ते देश बुडवू नये, एवढी अपेक्षा आहे.

शेतकरी कर्जमाफी, महागाई नियंत्रण, ईपीएस पेन्शन, भूमीहीन शेतकरी सन्मान योजना, खते व बियाण्यांवर जीएसटी नको या सगळ्या मागण्या तुम्ही अमान्य केल्या. फूड सबसिडीवरील निधी कमी केला. खतांचे अनुदान कमी केले. घरांसाठी फक्त 5 टक्के जादा तरतूद केली. नव्या योजनांचा फक्त उल्लेख करता, त्या काय आहेत, 60 हजार कोटी कुठे जाणार, हे स्पष्ट का सांगत नाही.

बोलाचीच कडी, बोलाचाच भात, जेवूनिया तृप्त कोण झाला, अशी अवस्था आहे. ज्या राज्याचा जीडीपी घसरला तिथे भाजप हरला आहे. असेच अर्थ धोरण राहिले तर भाजपचे पतन निश्चित आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत ते हरियाणा आणि महाराष्ट्रात पराभूत होणार आहे, हे नक्की आहे.

ट्रेलर बगवास, पिक्चर फ्लॉप…

विशाल पाटील यांनी थेट अर्थमंत्र्यांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, अर्थसंकल्पावर खूष असणारे काही खासदार मला म्हणाले, हा फक्त ट्रेलर आहे, मात्र अडचण अशी आहे की ट्रेलर पाहून पिक्चरचा अंदाज लागत नाही. मी परवा एक ट्रेलर पाहून बायकोसोबत सिनेमाला गेलो, अर्धा तासात कंटाळून बाहेर पडलो. अर्थसंकल्पाची अवस्था अशीच आहे. तुम्ही आमच्याकडे पाहू नका, पण तुमच्या 17 खासदारांकडे पाहून तरी निधी द्या. मला त्यांचे हसरे चेहरे पाहून काही ओळी सुचतात, ‘आज तुम जो इतना मुस्कुरा रहे हो, क्या दर्द है जो छुपा रहे हो.’ त्यांना चिंता आहे, त्यांच्या मतदार संघात जाऊन ते सांगणार काय? अर्थसंकल्पातून काय मिळाले? असा टोला खा. विशाल पाटील यांनी लगाविला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज