rajkiyalive

इस्लामपुरात विरोधकांची एकी जयंतरावांचे मताधिक्य भेदणार काय?

दिनेशकुमार ऐतवडे
इस्लामपुरात विरोधकांची एकी जयंतरावांचे मताधिक्य भेदणार काय? : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील एक महत्वाचे विधानसभा मतदार संघ म्हणजे इस्लामपूर विधानसभा मतदार संघ. गेल्या सात विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या पाठिशी उभा आहे. प्रत्येकवेळी नवा विरोधक जयंत पाटील यांच्यासमोर आला परंतु कुणाचाच टिकाव लागला नाही.

इस्लामपुरात विरोधकांची एकी जयंतरावांचे मताधिक्य भेदणार काय?

लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास 2009 आणि 2019 मध्ये जयंत पाटील यांच्या विचाराच्या उमेदवारामागे मतदार संघ राहिला. 2014 मध्ये मात्र जयंत पाटील यांचे उमेदवार कल्लापाण्णा आवाडे यांना पिछाडीवर रहावे लागले. यंदा कधी नव्हे ते विरोधक एकत्र आले आहेत. त्यामुळे विरोधक यंदाही जयंतरावांचे लीड कमी करणार की काय याद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.

2009 मध्ये निवेदिता माने आघाडीवर

2009 मध्ये मतदार संघांची निर्मिती झाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाटणीला गेली. खासदार असलेल्या निवेदिता माने यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. विरोधात शेतकर्‍यांचे नेते राजू शेट्टी होते. जयंतरावांचे सर्वच विरोधक राजू शेट्टींच्या मागे उभे राहिले. तरीही इस्लामपूर मतदार संघात निवेदिता माने यांनी लीड घेतले. राजू शेट्टींना 68 हजार 210 मते मिळाली तर निवेदिता माने यांना 71 हजार 500 मते मिळाली. तीन हजाराचे मताधिक्य निवेदिता माने यांनी घेतले परंतु या निवडणुकीत राजू शेट्टींचा विजय झाला.

2014 मध्ये राजू शेट्टींना 23 हजाराचे मताधिक्य

2014 मध्ये राज्ाू शेट्टींचे वातावरण सर्वत्र झाले होते. उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत बरेच दिवस चर्चा सुरू होती. राजू शेट्टींनी भाजपची कास धरली होती. मोदी लाट देशभरात आली होती. ही जागा काँग्रेसच्या वाटणीला गेली. इचलकरंजीच्या कल्लापाण्णा आवाडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. इस्लामपूर मतदार संघात जयंत पाटील आवाडेंच्या मागे उभे राहिले यंदाही सर्वच विरोधक राजू शेट्टींच्या मागे राहिले. यावर्षी कारखानदार विरोधात शेतकरी असा लढा झाला आणि राजू शेट्टींया या मतदार संघात सुमारे 23 हजाराचे मताधिक्य मिळाले आणि ते निवडून आले.

2019 मध्ये पुन्हा राजू शेट्टींना 18 हजाराचे लीड

भाजपचे आणि राजू शेट्टींचे बिनसले. राजू शेट्टी काँग्रेस आघाडीत सामिल झाले. जयंत पाटील यांना पहिल्यांदा राजू शेट्टींचा प्रचारा करावा लागला. जयंत पाटील शेट्टींच्या मागे राहिल्याने विरोधक शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्या बाजूने उभे राहिले. अटीतटीच्या लढतीत राजू शेट्टींना इस्लामपूरकरांनी 18 हजाराचे मताधिक्य दिले. तरीही राजू शेट्टींचा पराभव झाला. या मतदार संघात मागे राहूनही धैर्यशील माने विजयी झाले.

यंदा 2024 च्या निवडणुकीत समीकरणे तशीच आहेत. सर्वच विरोधक त्यामध्ये माजी मंत्री सदाभाउ खोत, सम्राट महाडिक, राहूल महाडिक, निशिकांत पाटील, गौरव नायकवडी, आनंदराव पवार सर्वचजण झाडून पुन्हा एकदा धैर्यशील मानेंच्या बाजूने उभे आहेत. तर जयंत पाटील यांची राष्ट्रवादी शिवसेना उबाठा गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांच्या मागे ठामपणे उभी आहे. 2014 चा अपवाद वगळता कायमच इस्लामपूर मतदार संघ जयंत पाटील यांच्या मागे उभी आहे. त्यामुळे यंदा सर्व विराधक मिळून जयंत पाटील यांच्या उमेदवाराचे मताधिक्य कमी करतात की मागे टाकतात हेच पहावे लागेल.

महायुती मानेंच्या तर महाविकास आघाडी सरूडकरांच्या मागे, राजू शेट्टी एकला चलो रे

या अगोदरच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या मागे कोणतातरी मोठा गट असायचा. राजू शेट्टींच्या मागे 2009 आणि 2014 मध्ये जयंत पाटील विरोधक ठामपणे उभे होते. 2019 च्या निवडणुकीत सर्वच विरोधक धैर्यशील मानेंच्या मागे एकसंघ होते. यंदा मात्र सर्वच विरोधक धैर्यशील माने यांच्या मागे आहेत. राजू शेट्टींची एकला चलोरे वाटचाल सुरू आहे. या अगोदर अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे शेट्टींची वाटचाल यंदा खडतर दिसत आहे.

जयंत पाटील यांचे जबाबदारी वाढली

जयंत पाटील सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या वाटणीला 10जागा आल्या आहेत. तरीही आपल्या घरची हातकणंगलेची जागा त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनी उमेदवारही तगडा काढला आहे. प्रदेशाध्यक्ष पदामुळे होमग्राउंडवर त्यांना यशस्वी व्हावेच लागेल.

विरोधकांची एकजूट विजयापर्यंत जाणार काय?

यंदा सर्वच विरोधक एकत्र आले आहेत. त्यातच निशिकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. पुढच्या विधानसभेला तेही उतरणार आहेत. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थिती त्यांना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मताधिक्य द्यावेच लागणार आहे. सर्वच विरोधक एकत्र कसे काम करणार यावरच पुढचे सर्वच गणित ठरणार आहे.

शेतकर्‍यांच्या जिवावर राजू शेट्टींची उमेदवारी

यंदा कोणताही मोठा नेता राजू शेट्टींच्या मागे उभा नाही. मतदार संघातील सर्वच मोठे नेते आणि दुसर्‍या फळीतील नेते त्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे राजू शेट्टींना मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. शेतकरी आणि कष्टकरी जनता हेच त्यांचे भांडवल असणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज