rajkiyalive

SANGLI VIDHANSABHA 2024 : निवडणूक न लढविण्याचा गाडगीळांचा निर्णय, भाजपला धक्का

जनप्रवास । सांगली

SANGLI VIDHANSABHA 2024 : निवडणूक न लढविण्याचा गाडगीळांचा निर्णय, भाजपला धक्का : विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वाढल्या असताना सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक मी लढविणार नसल्याचे जाहीर करीत मंगळवारी धक्का दिला. निवडणुकीसाठी मी पक्षाकडे तिकीट मागणार नाही. आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बनला आहे, त्यामुळे राजकारणातून थांबून संघटनात्मक काम करण्याचा निर्णय घेतला असून तशी विनंती मी पक्ष नेतृत्वाला केली असल्याचे आ. गाडगीळ यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केले. मागील दहा वर्षात चांगली विकासकामे करण्याचा प्रयत्न केला, मात्र जे प्रकल्प अपूर्ण राहिले असतील, ते पूर्ण करणारच असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

SANGLI VIDHANSABHA 2024 : निवडणूक न लढविण्याचा गाडगीळांचा निर्णय, भाजपला धक्का

आ. गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी न मागण्याचा निर्णय मी घेतला आहे. राजकारणात कधी तरी थांबलं पाहिजे, या मताचा मी आहे. आमचा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बनला आहे. आमच्या संघटनेची कार्यपद्धती प्रथम देश, नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी मी अशी आहे. मला पक्षाने दोनदा विधानसभा उमेदवारीची संधी दिली आता माझ्या ऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, असे माझं प्रामाणिक मत आहे. उमेदवारी मागणार नसलो तरी मी पक्षाचे काम यापुढेही करत राहणार आहे.आता मला विधानसभा उमेदवारी नको, अशी विनंती त्यांनी पक्ष नेतृत्वाला केली आहे.

माझ्यावर मतदारांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे प्रेम असेच कायम राहील, असा विश्वास आहे. भाजप जो उमेदवार देईल त्यांना विजयी करणे हाच माझा निर्धार असणार आहे.
दहा वर्षाच्या कारकिर्दीतले सर्वच प्रकल्प जे काही अपूर्ण करायचे राहिले आहेत. निवडणुकीच्या राजकारणातनं थांबलो तरी ते प्रकल्प मी लवकरच पूर्णत्वास नेईन.

मी निवडणुकीच्या राजकारणातून थांबतोय परंतु संघटनात्मक काम तसेच समाजकारण करत राहणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांनी मला सांभाळलं मी त्यांना संभाळल मला इथपर्यंत आणलं त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भविष्याची मी अशाच पद्धतीने उभा राहणार आहे. आ. गाडगीळ यांनी पुढे म्हटले आहे की, सांगलीकरांनी दिलेल्या आशीर्वादामुळे दहा वर्षांपूर्वी विधानसभेत गेलो. गाडगीळ घराणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांच्या माध्यमातून अनेक वर्षे समाजकारणात होते.

भाजपच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काही वर्षे सांभाळली होती. अनेक निवडणुकीत पक्षाने दिलेल्या जबाबदार्‍यांचे पालन मी यशस्वीपणे केले होते. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीते मला उमेदवारी दिली. जनतेच्या आशीर्वादामुळे विजयी झालो. गेल्या दहा वर्षात सांगलीचा सेवक म्हणून मी जनतेची निष्काम भावनेने सेवा केली.
विधानसभा मतदारसंघातील विविध नागरी प्रश्न तडीस नेण्याचे प्रयत्न केले. 2014 पूर्वी सांगली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब होती.

आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम सांगलीतील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. विधानसभा क्षेत्रातील शहरी भाग, शहराचा विस्तारित भाग तसेच विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न हाती घेवून रस्त्यांची कामे केली. मागील अनेक वर्ष प्रलंबित असणार्‍या व सांगलीला भेडसावणार्‍या सांगली पेठ रस्त्याचे काम मार्गी लावण्यात यश आले. विश्रामबाग रेल्वे फाटक, तसेच हरीपूर-कोथळी पुलाचा प्रश्न मार्गी लावला. अंकली, बामणोळी, बिसूर, बुधगाव, हरीपूर, इनामधामणी, जुनी धामणी, पद्माळे, माधवनगर, नांद्रे, खोतवाडी, वाजेगाव या गावातील रस्ते, स्मशानभूमी, तिक्षक्षेत्र विकास योजनांच्या माध्यमातून कामे केली.

मंदिरे, गटारी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्राची लोकोपयोगी कामे केली. महापालिका क्षेत्रातही नागरी सुविधा देण्याचे काम प्रामाणिकपणे केले. विधानसभा मधील सांगलीत येणारे प्रमुख रस्ते, छोटे मोठे पूल, ग्रामीण भागातील मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ते तसेच विविध योजने मधील विकास कामे मंजूर असून येणार्‍या काळात पूर्ण होतील. सांगली सिव्हिल हॉस्पिटल हे गोरगरिबांचे आशास्थान आहे. या रुग्णालयाकडे यापूर्वी तसे दुर्लक्षच होते. मी आमदार झाल्यानंतर मात्र या हॉस्पिटलमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी आणि नवे विभाग सुरु केले. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा आता उपलब्ध झालेल्या असल्याचे आ. गाडगीळ यांनी यांनी निवेदनात म्हटले आहे.

सांगलीकर जनतेचे प्रेम भविष्यातही माझ्यावर राहिल

मी निवडणुकीच्या राजकारणातून थांबतोय, परंतु संघटनात्मक काम तसेच समाजकारण करत राहणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली, त्यांनी मला सांभाळलं. मी त्यांना संभाळल मला इथपर्यंत आणले. त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भविष्याची मी अशाच पद्धतीने उभा राहणार आहे. सांगलीकर जनतेने जी मला सेवेची संधी दिली. सांगलीकर जनतेचे प्रेम व आशीर्वाद भविष्यातही माझ्यावर राहो, असा विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला.

 

इच्छुकांच्या आशा पल्लवित
भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्याने भाजपमधील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे, अशातच आ. गाडगीळ यांनी धक्कादायक निर्णय घेतला असल्याने भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, शेखर इनामदार, माजी आ. दिनकर पाटील, माजी आ. नितीन शिंदे यांच्यामध्ये उमेदवारीवरुन चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज