rajkiyalive

khanapur vidhansabha 2024 : खानापूर विधानसभा मतदारसंघातून ’वंचित’कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर

महायुती व महाविकास आघाडीची वाढणार डोकेदुखी ; तिरंगी लढतीची चिन्हे

प्रताप मेटकरी, विटा

khanapur vidhansabha 2024 : खानापूर विधानसभा मतदारसंघातून ’वंचित’कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर : सांगली जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असणार्‍या खानापूर विधानसभा मतदारसंघात आता एक मोठी राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातून ओबीसी नेते संग्राम माने यांची उमेदवारी जाहीर केली. वंचितच्या उमेदवारीने मात्र महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.

khanapur vidhansabha 2024 : खानापूर विधानसभा मतदारसंघातून ’वंचित’कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांनी पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदाच खानापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, खानापूर मतदारसंघातून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ओबीसी नेते संग्राम माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची पुणे येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी भेट घेऊन खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी संग्राम माने यांना तयारीला लागा अशा सूचना दिल्या होत्या. तेव्हापासूनच खानापूर विधानसभा मतदारसंघात वंचितचा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी अधिकृत जाहीर केली. या यादीत खानापूर विधानसभा मतदारसंघातून संग्राम माने यांची उमेदवारी जाहीर केली. वंचितच्या या उमेदवारीमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ माजलेली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संग्राम माने हे खानापूर तालुक्यातील नागनाथनगर गावचे रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण बी कॉम झाले असून, सध्या ते ओबीसी नेते म्हणून कार्यरत आहेत. संग्राम माने यांनी ओबीसी समाजासाठी मोठे काम केलेले आहे. विविध प्रश्नांसाठी लक्षवेधी आंदोलने केली आहेत. त्यांच्या पाठीमागे ओबीसी समाज मोठ्या ताकतीने आहे. तसेच मतदारसंघात ओबीसी समाजाचे मतदान हे जवळपास दीड लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळे ओबीसीचे मतदान हे निर्णायक ठरणारे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संग्राम माने यांची उमेदवारी मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे. मात्र वंचितच्या उमेदवारीमुळे खानापूर मतदारसंघात नवा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला असून महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.

माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने गेल्या 15 वर्षांमधील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या योगदानाचा विचार करून वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देऊन न्याय दिला आहे. राजकारणात एक सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न असेल. येणार्‍या विधानसभा निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाणार आहे. मला लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाल्यास संधीचे सोने करेन. आगामी काळात खानापूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मूलभूत विकासकामे करून राज्यात रोलमॉडेल करण्याचा माझा प्रयत्न असेल.
– संग्राम माने

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज