rajkiyalive

shirala vidhansabha news :शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडीक यांची बंडखोरी ः अर्ज दाखल करणार

सर्वसामान्य जनता, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर अपक्ष निवडणूक लढविणार

इस्लामपूर ः प्रतिनिधी

shirala vidhansabha news :शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडीक यांची बंडखोरी ः अर्ज दाखल करणार : शिराळा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला उमेदवारीचा शब्द दिला होता. परंतू अखेरीस आमचा विश्वासघात केला. भाजपा नेत्यांनी उमेदवार जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. आता सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर शिराळा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार आहे. अशी घोषणा भाजपचे शिराळा मतदारसंघ प्रमुख सम्राट महाडीक यांनी केली. शिराळ्यातही सांगली पॅटर्न दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

shirala vidhansabha news :शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडीक यांची बंडखोरी ः अर्ज दाखल करणार

भाजप पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे महाडीक यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. रविवारी पेठ नाक्यावर महाडीक यांच्या निवासस्थानी महाडीक गटाच्या व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. गर्दीचे रूपांतर मेळाव्यात झाले. झालेल्या अन्यायावर तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करण्यात आली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सम्राट महाडीक व जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवून, प्रमुख नेत्यांशी चर्चा करुन शिराळा व इस्लामपूर मतदारसंघातील आपली भुमिका स्पष्ट करु असे सांगितले. अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह केला.

जेष्ठ नेते सी.बी.पाटील, जगन्नाथ माळी, स्वरुप पाटील, माजी नगरसेवक कपील ओसवाल, सतीश महाडीक, केदार नलवडे, अमित ओसवाल, डॉ.सचिन पाटील, इसाक वलांडकर, सनी खराडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सम्राट महाडीक म्हणाले, राज्यात सत्ता नसताना आम्ही भाजप पक्षात प्रवेश केला. प्रवेशावेळी आम्हाला शिराळा मतदारसंघातून उमेवारी देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यामुळे गेली 5 वर्षे आम्ही लढण्याची तयारी केली. पक्षाचे काम घराघरात पोहचविले. लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे पक्षाने आम्हाला विचारात घेवून येथील निर्णय घ्यायला हवा होता. भाजप नेत्यांनी नुसती आश्वासने दिली.

आम्हाला महामंडळ, विधानपरीषद नको. फक्त शिराळ्यातून उमेदवारी द्या. एवढीच आमची मागणी होती.

मी अर्ज भरला तर मागे घेणार नाही. तुम्हाला पाहिजे तोच निर्णय होईल. सर्वांचा विचार घेवून निर्णय घेणार. राहूल महाडीक म्हणाले, भाजप पक्षप्रवेश करताना सम्राट महाडीक यांना शिराळा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू सम्राट महाडीक यांना उमेदवारी न मिळाल्याने शिराळ्यासह इस्लामपूर मतदारसंघातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. हुतात्मा गट, आनंदराव पवार, विक्रम पाटील यांच्याशी चर्चा करुन इस्लामपूर मतदारसंघातील उमेदवारी बाबत निर्णय घेवू. वाळवा तालुक्यातील 48 गावे व शिराळा विधानसभा मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.0

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज