rajkiyalive

miraj vidhansabha election news : मिरजेत 50 वर्षे काँग्रेसचा आमदार, तरीही आघाडीच्या राजकारणात पक्षाचा बळी

दिनेशकुमार ऐतवडे

miraj vidhansabha election news : मिरजेत 50 वर्षे काँग्रेसचा आमदार, तरीही आघाडीच्या राजकारणात पक्षाचा बळी: गेल्या 15 दिवसापासून सतत चचेंत असणार मिरज विधानसभेची उमेदवारी अखेर घोषित झाली. महाविकास आघाडीच्या जागेच्या स्पर्धेत ही जागा शिवसेना उबाठा गटाला गेली आणि येथून शिवसैनिक तानाजीराव सातपुते यांना उमेदवारी मिळाली. 1952 पासून 50 वर्षे काँग्रेसने येथे आमदारकी भोगली. परंतु आघाडीच्या राजकारणात आणि नेत्यांच्या दुबळेपणाने मिरजेतून पुन्हा एकदा हात हद्दपार झाले. गेल्या निवडणुकीतही सोयीच्या राजकारणात येथे हात चिन्ह गमवावे लागले होते.

miraj vidhansabha election news : मिरजेत 50 वर्षे काँग्रेसचा आमदार, तरीही आघाडीच्या राजकारणात पक्षाचा बळी

मिरज मतदार संघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून म्हणजेच 1952 पासून 1990 पर्यंत येथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. जी. डी. पाटील, मोहनराव शिंदे, एन. आर. पाठक अशा दिग्गजांनी या मतदार संघांचे नेतृत्व केले. 1952 मध्ये श्रीमंतीबाई कळंत्रेआक्का, 1957, 1962 आणि 1967 च्या निवडणुकीत जी. डी. पाटील, 1978, 1980, 1985 च्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मोहनराव शिंदे, तसेच 1995 आणि 1999 मध्ये हाफिज धत्तुरे यांनी या मतदार संघांचे पर्यायाने काँग्रेसचे नेतृत्व केले.

भाजप आणि शिवसेनेच्या राजकारणातही येथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. नाही म्हणायला येथे शिवसेनेचीही थोडीफार ताकद आहेच परंतु विजयापर्यंत ते कधीच पोहोचले नाहीत. आप्पासाहेब काटकर, बजरंग पाटील यांनी येथून शिवसेनेची उमेदवारी केली होती. परंतु त्यात त्यांचा पराभव झाला. एकूणच या मतदार संघात काँग्रेसचे पहिल्यापासूनच वर्चस्व राहिले आहे.

मिरज मतदार संघात मिरज शहर आणि मिरज पूर्व भागाचा समावेश होता. शहराएवढेच ग्रामीण भागाचेही मतदान आहे. हा पूर्वीपासून दादा घराण्याच्या पाठिमागे राहिला आहे. बाजार समिती, जिल्हा बँक, जिल्हा परिषद इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसचा मोठा व्होट बँक आहे.

2009 मध्ये मतदार संघांची पुनर्रचना झाली आणि मिरजेचे गणित बिघडले. मिरज मतदार संघ राखीव झाला. या कारणीभूतही येथील राज्यकर्तेच आहेत. राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे मिरजेकडे दुर्लक्ष झाले आणि मतदार संघ राखीव झाला. 2009 मध्ये जतमधून आलेल्या सुरेख खाडेंनी येथे बस्तान बसविले. 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून खाडेंनी हॅटट्रीक केली आहे. मिरज मतदार संघात आजपर्यंत केवळ काँग्रेसच्या जी. डी. पाटील, आणि मोहनराव शिंदे यांनाच विजयाची हॅट्रीक करण्याची संधी मिळाली आहे.
1995 मध्ये युती शासन सत्तेवर आले आणि त्यावेळीपासून भाजपची ताकद राज्यात वाढत गेली. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी वाटण्या सुरू झाल्या.

आता आघाड्यांच्या राजकारणात सांगली जिल्ह्यातील आठ मतदार संघांवर अनेकांनी दावा केला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तीन पक्ष आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांना हा मतदार संघ हवा आहे. शिवसेनेला जिल्ह्यात अद्याप एकही जागा मिळाली नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ही जागा शिवसेनेला द्यावी लागली. परंतु याचा फटका काँग्रेसला बसला आहे. गेल्या दोन निवडणुकीत या मतदार संघातून काँग्रेसेचे हात चिन्ह हद्दपार झाले आहे. त्यामुळे आघाडीच्या राजकारणात काँग्रेसचा बळी असेच म्हणावे लागेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज