kolhapur political news : कोल्हापूर जिल्ह्यात सरपंचपदासाठी तिसर्‍यांदा फेरआरक्षण काढणार

SHARE:

kolhapur political news : कोल्हापूर जिल्ह्यात सरपंचपदासाठी तिसर्‍यांदा फेरआरक्षण काढणार:  सुधारित अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 1,026 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सोमवारी (दि.21) तिसर्‍यांदा फेरआरक्षण काढण्यात येणार आहे. यापूर्वी ओबीसी गटातील वाढलेल्या चार जागांसाठीच चार तालुक्यांमध्ये सरपंचपदाचेआरक्षण काढले होते; पण शासनाच्या निर्देशाप्रमाणे अधिसूचनेत बदल झाल्याने आधीची अधिसूचना रद्द झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांतील आरक्षण काढले जाणार असून, त्यामुळे चिठ्ठ्या टाकून काढले गेलेले आरक्षणच बदलणार आहे. गावातील राजकीय समीकरणेही बदलणार असून, इच्छुक पुन्हा गॅसवर गेले आहेत.

kolhapur political news : कोल्हापूर जिल्ह्यात सरपंचपदासाठी तिसर्‍यांदा फेरआरक्षण काढणार

राज्यातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 27 टक्के आरक्षण या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील करवीर, आजरा, शाहूवाडी व राधानगरी या चार तालुक्यांमधील सर्वसाधारण गटातील सरपंचपदाचे आरक्षण प्रत्येकी एक जागा कमी होऊन नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये वाढविण्यात आली होती. त्यानुसार 26 जूनला या चार तालुक्यांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले.

मात्र, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत विभागाने सर्वच तालुक्यांना नव्याने ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची सूचना पाठवली आहे. यानुसार जिल्ह्यातील 12 तालुक्यांतील 1,026 गावांमधील सरपंचपदाचे आरक्षण 21 तारखेला नव्याने काढले जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे शासनाने पूर्वी काढलेल्या अधिसूचनेत बदल केले गेले. त्यामुळे मूळ अधिसूचना रद्द करून 7 जुलै रोजीच्या मार्गदर्शनपत्रानुसार नव्याने सरपंच आरक्षण काढावे लागणार आहे.

kolhapur-political-news-reservation-for-the-post-of-sarpanch-will-be-made-for-the-third-time-in-kolhapur-district

मात्र, 13 जूनच्या अधिसूचनेनुसार सरपंच आरक्षणात बदल होणार नसला, तर ज्याठिकाणी चिठ्ठ्या टाकून सरपंच आरक्षण काढण्यात आले आहे, तेथे मात्र आरक्षण बदलणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तहसील कार्यालये, पंचायत समिती सभागृहांमध्ये दुपारी 12:30 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

आरक्षित प्रवर्ग : संख्या

अनुसूचित जाती : 138 (69 महिला)
अनुसूचित जमाती 7 (4 महिला)
नागरिकांचा मागास प्रवर्ग : 277 (139 महिला)
सर्वसाधारण : 604 (302 महिला)

तालुका : ग्रामपंचायती : अनुसूचित जाती : अनुसूचित जमाती : मागास प्रवर्ग : सर्वसाधारण
पन्हाळा : 111 : 16 : 0 : 30 : 65
शाहूवाडी : 106 : 13 : 1 : 29 : 63
करवीर : 118 : 19 : 1 : 32 : 66
गगनबावडा : 29 : 5 : 0 : 8 : 16
कागल : 83 : 12 : 0 : 22 : 49
राधानगरी : 98 : 11 : 0 : 27 : 60
हातकणंगले : 61 : 12 : 1 : 16 : 32
शिरोळ : 52 : 10 : 2 : 14 : 26
आजरा : 73 : 8 : 0 : 20 : 45
भुदरगड : 97 : 11 : 0 : 26 : 60
गडहिंग्लज : 89 : 10 : 1 : 24 : 54
चंदगड : 109 : 11 : 1 : 29 : 68
एकूण : 1026 : 138 : 7 : 277 : 604

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *