maharashtra govt.news : मंत्रीमंडळात होणार लवकरच फेरबदल? : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच आपल्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांसाठी धक्का तंत्र वापरणार असून कोणा कोणाला धक्का बसणार ? मात्र हे धक्का तंत्र भाजपच्या मंत्र्यांपुरतं मर्यादित असेल की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठीही असेल अशी चर्चा व विधानभवनात रंगली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या धक्का तंत्राचा फटका अनेक बड्या मंत्र्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
maharashtra govt.news : मंत्रीमंडळात होणार लवकरच फेरबदल?
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्या अनुषंगाने आता राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद दिलं जाईल,
तर अनेक मंत्र्याचे पत्ते कट केले जातील. खांदे पालट होईल, अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे अनेक मंत्र्यांना धक्का बसू शकेल असे बोललं जात आहे. पक्षसंघटनेत चांगले काम केलेल्या किंवा आपापल्या भागांमध्ये मजबूत पकड असलेल्या नेत्यांना मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत.
त्यासोबतच, “काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद दिलं जाईल, असेही बोललं जात आहे. यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.
maharashtra-govt-news-will-there-be-a-reshuffle-in-the-cabinet-soon
गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा संभाव्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून अनेक विद्यमान मंत्र्यांचे पत्ते कट केले जातील, असे बोललं जा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या ‘धक्का तंत्रा’ची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











