rajkiyalive

atpadi vidhansabha news : आटपाडीच्या मेळाव्यात देशमुख बंधूत जुंपली राजेंद्रअण्णा आज अर्ज दाखल करणार : अमरसिंह भाजपबरोबरच

atpadi vidhansabha news : आटपाडीच्या मेळाव्यात देशमुख बंधूत जुंपली राजेंद्रअण्णा आज अर्ज दाखल करणार : अमरसिंह भाजपबरोबरच : विधानसभेची रणनिती ठरविण्यासाठी आटपाडीत देशमुख बंधूनी बोलाविलेल्या मेळाव्यात दोन्ही बंधूमध्ये चांगलीच जुंपली. राजेंद्रअण्णा देशमुख उमेदवारीवर ठाम असून, ते आज मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत तर अमरसिंह देशमुख यांनी मी भाजपबरोबर असून, युतीचाच प्रचार करणार असल्याचे सांगितले.

atpadi vidhansabha news : आटपाडीच्या मेळाव्यात देशमुख बंधूत जुंपली राजेंद्रअण्णा आज अर्ज दाखल करणार : अमरसिंह भाजपबरोबरच

मी भाजपमध्येच असून, विधानसभेचा प्रचारही करणार

यावेळी अमरसिंह देशमुख म्हणाले, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व त्यांचे शिष्टमंडळ यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला व उमेदवारी मागितली. वरिष्ठ नेतेमंडळीच्या बैठका घेतल्या याबाबत मला कल्पना नव्हती. सोशल मिंडियावर या सर्व घडामोडी समजल्या. उमेदवारी अर्ज भरण्याचा एक दिवस बाकी असताना मला पुढे होण्याचे आमंत्रण दिले.

मी भारतीय जनता पार्टीत असून, विधानसभेला त्यांचे काम करणार आहे. तालुक्यात बाकीच्या निवडणुकीत अस्मिता कुठे असते असा सवालही त्यांनी कार्यकर्त्यांना केला. मी एकटा असून कोणीही माझ्या बरोबर येत नाही. माझे मी माणगंगा कारखाना चालू करतो असे आवाहनही त्यांनी केले.

अमरसिंह देशमुख म्हणाले, तालुक्याची अस्मिता असल्यामुळे तालुक्याने निर्णय घ्यावा मला वेठीस धरून नका. मी भारतीय जनता पार्टीकडून प्रचार करणार मी पक्ष सोडलेला नाही. उद्या कोणीतरी जाऊन उमेदवारी अर्ज भरले तर मी त्यांचा प्रचार करणार नाही. मी एकटा असल्यामुळे माझी राजकीय नुकसान होणार आहे. ते मी सोसणार आहे. 2014 ला माझी उमेदवारी होती. त्यावेळी मी इतर उमेदवार्‍यांच्या बरोबर सर्व प्रयत्न केले होते.

त्यावेळी मला थांबवण्यात आले. आटपाडी तालुक्याची अस्मिता असल्यामुळे तालुक्यातील सर्वानी मिळून उमेदवार द्यावा मी भाजपचा कार्यकर्ते म्हणूनच काम करेन. आमदारकी असल्यावर कारखाना मिळतो हे असत्य आहे.स्व.अनिलभाऊ बाबर व स्व.आर आर पाटील यांनी आमदार असतानाच कारखाना विकला आहे.कारखाना चालवणे आणि आमदारकी यांचा काहीएक संबंध नाही. मी एकटा वरिष्ठ नेतेमंडळीची काठी भेटी घेऊन माणगंगा साखर कारखान्याचे धुराडेे पेटवणार असे वक्तव्य त्यांनी केले.

माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, आटपाडी तालुक्याचा आमदार होण्यासाठी जनतेतून आग्रह झाल्यावर मी वरिष्ठ नेते मंडळीची भेट घेतली.राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी मला बोलवले होते. त्यांचा आदर ठेवून मी भेट घेतली होती. मागच्यावेळी विधानसभेला ज्याना पाठिंबा दिला.त्यांनीच विविध कारस्थान करून कारखाना बंद पाडला. जनतेला वाटत असेल तर मी उमेदवारी करतो. अजून चार दिवस सर्वानी नेतेमंडळीशी चर्चा करावी. उमेदवारी अर्ज ठेवतो. तसे वातावरण नसले तर कोणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवू पण मी 29 रोजी अपक्ष अर्ज भरणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज