आ. सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ सभा, तयारी पूर्ण
sangli bjp news : सांगलीत अमित शहांची तोफ धडाडणार : सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ केंद्रिय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी (दि. 8) सांगलीत येत आहेत. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगणावर दुपारी दोन वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीतील घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या सभेची जय्यत तयारी करीत आहेत. शहा काय बोलणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली.
sangli bjp news : सांगलीत अमित शहांची तोफ धडाडणार
सांगली मतदारसंघातून आमदार गाडगीळ तिसर्यांदा निवडणूक लढवत आहेत. दिनांक 24 ऑक्टोबररोजी त्यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू आहे. वेगवेगळे समाज घटक, मंडळे, क्रीडा संस्था या ठिकाणी उपस्थित राहून गाडगीळ यांनी लोकसंपर्क मोहीम राबवली आहे. बुधवारी सायंकाळी सांगलीत गणेश मंदिरात त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यानंतर मारुती चौकात झालेल्या प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली होती. सुधीरदादांना विजयाची हॅट्रिक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्ष महायुतीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेबद्दल सांगली विधानसभा मतदारसंघातच नव्हे संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता आहे. शहा या निवडणूक प्रचार दौर्यात नेमके काय बोलणार याबद्दल लोक लोकांमध्ये उत्सुकता आहे. भाजप तसेच महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, जनसुराज्य शक्ती, रयत क्रांती संघटना असे सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सभेची तयारी करीत आहेत. प्रचार शुभारंभाच्या सभोत स्वतः आमदार गाडगीळ यांनी लोकांना अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार्या जाहीर सभेसाठी येण्याचे आवाहन केले होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



