rajkiyalive

sangli bjp news : सांगलीत विमानतळ, हळद बोर्ड शाखा सुरु करणार : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, सुधीर गाडगीळांच्या प्रचारार्थ विराट सभा

sangli bjp news : सांगलीत विमानतळ, हळद बोर्ड शाखा सुरु करणार : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, सुधीर गाडगीळांच्या प्रचारार्थ विराट सभा : आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला वसंतदादा साखर कारखाना शरद पवारांच्या सत्तेत बंद पडला. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेच्या काळात राज्यातील दोनशे साखर कारखान्यापैकी 101 वर आले. ते अडचणीत असल्याचे भासवून कारखान्यांची विक्री केली, त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांची मृत्यूघंटा वाजल्याची टीका केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. आत्तापर्यंत काँग्रेस सरकारने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. महायुतीचे सरकार जे आश्वासन देते, ते पाळत आहे.

sangli bjp news : सांगलीत विमानतळ, हळद बोर्ड शाखा सुरु करणार : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, सुधीर गाडगीळांच्या प्रचारार्थ विराट सभा

विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन करीत सांगलीत विमानतळ, हळद बोर्डाची शाखा आणि लवकरच मोठा प्रकल्प उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगणावर भाजप-महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केंद्रिय गृहमंत्री शहा बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, माजी खासदार संजयकाका पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आ. दिनकर पाटील, नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, मकरंद देशपांडे उपस्थित होते.

केंद्रिय मंत्री शहा म्हणाले, राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. यानंतर महायुतीचे सरकार बनेल. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. कमळ सांगलीमध्ये देखील फुलणार आहे. तुम्ही सुधीर गाडगीळ यांना मतदान करणार नाहीत तर भारताला मजबूत करणार आहे. सांगलीत गाडगीळ यांना मतदान केले तर ते मत मोदी यांना जाईल. काँग्रेस आणि आघाडीचा अजेंडा दृष्टीकरणचा अजेंडा आहे. भारताला जातीवादात अडकवणार आहेत. काश्मीर आपले आहे. 370 हटले. काश्मीरच्या विधानसभेत काँग्रेसने 370 हटवण्याचे निर्णय पारित केले आहे. राहुल गांधींच्या चौथ्या पिढीला देखील हे कलम हटणार नाही. भारताचा प्रत्येक युवा लढाई लढण्यास तयार आहे.

सांगलीत विमानतळ, हळद बोर्ड शाखा आणि मोठा प्रकल्प

महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठे काम आम्ही केले आहे. सांगलीत लवकरच विमानतळ होणार आहे. दिल्ली, बेंगलोर आणि चेन्नई येथे जाण्यासाठी विमानतळ होणार आहे. मिरज रेल्वे लाईनचे पूर्ण इलेक्ट्रिकचे पूर्ण झाले आहे. वंदेभारत सुरु झाली. हळद पोर्ट बनवले आहे त्याची शाखा आम्ही सांगलीत काढणार आहे. याशिवाय लवकरच मोठा प्रकल्प सुरु करणार असल्याची घोषणाही केंद्रिय मंत्री शहा यांनी केली.

सहकाराची मृत्यूघंटा पवार कंपनीने वाजवली

वसंतदादा यांच्या नावाने आशियायी खंडातील सर्वात मोठा कारखाना होता. मात्र तो विकण्याचा घाट शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घातला. महाराष्ट्रात 200 साखर कारखाने होते. साखर कारखान्याची दुरावस्था शरद पवारांच्या काळात झाली. सहकाराची मृत्यूघंटा वाजविण्यात शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांचा हात असल्याची टीकाही मंत्री शहा यांनी केली. मोदींनी कारखान्यावरील टॅक्स माफ केला. शिवाजी स्टेडियम, शासकीय रुग्णालय, विमानतळ येथे घोटाळे करण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे.

पवारांना खोटे बोलण्याची सवयच

राहुल गांधींच्या सोबत राहून शरद पवारांना खोटे बोलण्याची सवय लागली आहे. ठाकरे आणि पवार यांचे सरकार होते त्यावेळी सर्वात कमी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. आमचे शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात गुंतवणूक वाढली. महाराष्ट्रातील सर्व प्रोजेक्ट थांबवण्याचे काम शरद पवार आणि कंपनी यांनी केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी खालच्या स्थरावर जाऊ नका, त्यांना आता मुख्यमंत्री सुद्धा कोणी बनवणार नाहीत. छत्रपती संभाजी नगर महान बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना सत्ता प्राप्त करण्यासाठी सरेंडर केले आहे.

काँग्रेसच्या काळात देशावर आतंकवादी हल्ले

राहुल, शरद पवार, ममता, स्टॅलिन हे सर्वजण काऊ काऊ आहेत. काँग्रेस सरकार काळात आतंकवादी हल्ले झाले. मात्र आमचे सरकार आल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकसह पाकिस्तानमध्ये घुसून आम्ही आतंकवाद्यांना मारले. मोदींनी धर्म आणि संस्कृतीला सन्मान देण्याचे काम केले. संविधान हा विश्वासाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील एका सभेत संविधानाचे प्रतीक असलेले रिकामे पुस्तक वाटण्यात आले. राहुल गांधींनी संविधानाचा अपमान करून महाराष्ट्रासह देशातील जनतेची फसवणूक केली आहे. जे लोक खोट्या संविधानाच्या प्रति वाटतात त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, असा सवाल उपस्थित केला.

संविधानाला हात लावायची कुणाची हिंमत नाही

कुणाच्या मायच्या लालची हिम्मत नाही कि संविधानाला हात लावेल. अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्यांच्या आरक्षणाला आम्ही हटवू देणार नसल्याचा इशारा केंद्रिय गृहमंत्री शहा यांनी दिला. राहुल गांधी यांनी संविधानाचा अपमान केला आहे, तो केवळ संविधानाचा नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचा असल्याची तोफ डागली.

प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतात पाणी

70 वर्षांपुढील वृद्धांना पाच लाख रुपये योजनेतून उपचारासाठी मिळणार आहेत. 36 हजार घर सांगलीत आम्ही दिले आहेत. अजून 40 हजार घरे आम्ही देणार आहे. पाच लाख लोकांना 5 किलो धान्य आम्ही देत आहोत. महायुतीच्या सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यात सिंचन योजनेचे जाळे पसरवून प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतात आम्ही पाणी पोहोचवणार असल्याचेही केंद्रिय गृहमंत्री शहा यांनी सांगितले.

मोदी वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करणार आहेत. पवार आणि कंपनी हे कायदे सुधारण्यास विरोध करत आहे. कर्नाटकात गावच्या गाव, कॉलेज, शाळा, मंदिर वक्फ प्रॉपर्टी केली आहे. आम्ही वक्फ कायदा बदलणारच कोणी कितीही विरोध करू दे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हा वक्फ कायदा बदलास कितीही विरोध करु देत? आम्हीच बदलूच. प्रत्येक शेतकर्‍याला केंद्रातून सहा हजार आणि राज्यातून सहा हजार असे 12 हजार मिळत आहेत. तुम्ही पुन्हा युतीचे सरकार बनवा या 12 हजाराला आम्ही 15 हजार करण्याचे काम करू.

स्वागत करताना आमदार सुधीर गाडगीळ यांनी मागील दहा वर्षात विकासकामे केली आहे, अद्यापही काही कामे प्रलंबित आहेत. उर्वरित कामे पूर्ण करुन मतदारससंघ मागणीमुक्त करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन केले.
या सभेला शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, अजितदादा गटाचे जिल्हाप्रमुख पद्माकर जगदाळे, जनसुराज्यचे समित कदम, गौतम पवार, नीता केळकर, अ‍ॅड स्वाती शिंदे, गितांजली ढोपे-पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मतदार सहभागी होते.

भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

सांगलीत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आमदार सुधीर गाडगीळ, डॉ. सुरेश खाडे आणि संजयकाका पाटील यांना मोठ्या मताधिक्यांनी विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले. शहा यांच्या सभेसाठी गटागटाने लोक येत होते. दुचाकी गाड्या, चाकी गाड्यांनी कार्यकर्ते भाजपाचे झेंडे लावून मोठ्या संख्येने सभास्थळी आले होते. शहराच्या विविध भागातून महिला रॅलीने सभेला हजेरी लावली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज